माहे मार्च २०२४ चे वेतन रमजान ईद आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वी करणे बाबत
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी दि ३१ मार्च २०२४ रोजी अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई -३२, महाराष्ट्र शासन यांना पत्र पाठवून विनंती केली आहे कि.....
संदर्भ-
१. मा. आयेक्त शिक्षण यांचे पत्र शिआका / ५६०७ / २०२४ / संघटाना निवेदने / आस्था- क / माध्य / १९८० दि. १८/०३/२४
२. श्री तानाजी कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना यांचे निवेदन एमपीएसएसएम/ ६० / २०२४ / दि.१८/०३/२४
उपरोक्त विषयान्वये माहे मार्च २०२४ चे वेतन रमजान ईद आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी करणे बाबत निवेदन प्राप्त झाले असून राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे वेतन दि.०५/०४/२४ पूर्वी अदा करण्यासाठी विहित वेळेत अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे ही विनंती.
(दिपक चवणे) शिक्षण उपसंचालक (अं. व नि)
माध्यमिक व उच्च माध्यमिक
प्रत
१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य पुणे -१, यांना माहितीस्तव सविनय सादर
२. /- अधीक्षक वेतन व भनिनि पथक माध्यमिक सर्व यांना सूचित करण्यात येते की उपरोक्त निवेदनाच्या अनुषंगाने मार्च २०२४ चे वेतन देयक तयार ठेवावे. अनुदान प्राप्त होताच तात्काळ कार्यवाही करणे शक्य होईल.
३. श्री तानाजी कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना, व्दारा युवराज कलशेट्टी सी-
८१२ / विराट नगर, विरार (प) पालघर ४०१३०३
अधिक माहिती साठी खालील पत्र वाचा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .