समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये शासकीय शाळांमध्ये मुलांच्या प्रतिभेचे संगोपन करण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमाची (Personality Development Programme for Nurturing Talents) राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना.
कला केवळ गनोरंजनाचे साधन म्हणून नव्हे तर आत्म अभिव्यक्ती आणि आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य करते. ज्या विद्याथ्र्यांना कला क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे त्यांना दर्जेदार प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचा अभाव यासारख्या अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. शालेय जीवनात विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अंतर्भूत असलेली सर्जनशीलता ओळखून त्याचे सवर्धन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे विद्यार्थ्याना त्यांची कलात्मक आवड जोपासण्यासाठी व जीवनावश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल व विद्यार्थ्याना कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य प्राप्त होईल. याकरिता प्रख्यात कलाकारांद्वारे शिकविलेले अभ्यासक्रम विद्यार्थ्याना कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि ज्ञान प्राप्त करण्यास सहकार्य करतील. त्याअनुषंगाने मुलांच्या प्रतिभेचे संगोपन करण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सन २०२३-२४ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत Project Innovation (Rec) - (State Specific) (Elementary) - Personality Development Programme for Nurturing Talents अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता १ ली ते ८ वी च्या ६५.४९४ शाळांमध्ये (प्राथमिक आणि माध्यमिका विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन करण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमाची (Personality Development Programme for Nurturing Talents) अमलबजावणी करण्याकरिता तरतूद मंजूर आहे.
केंद्र शासनाने मंजूर केलेल्या निधीच्या अधिन राहून या कार्यालयाकडून विहित प्रक्रियेद्वारे M/s Earthen Roots Private Limited या सेवादारकाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वागिण व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसेच विविध कलागुणांचे संवर्धन करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. दि. ०१/०३/२०२४ ते दि. ३१/०३/२०२४ या कालावधीसाठीचा त्यांचे सोबत आवश्यक तो करार करण्यात आला असून उक्त संवादारकारा सा पुरवठा आदेश निर्गमित करण्यात आला असून सदर सेवादारामार्फत डिजिटल इंटरएक्टिव्ह प्लॅटफॉर्मद्वार प्रख्यात कलाकारांद्वारे त्यांच्या संबंधित विषयांमध्ये नैपुण्य असलेल्या कौशल्यांचे अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत. याबाबतचा Scope of Work पुढीलप्रमाणे-
सबब, M/s. Earthen Roots Private Limited या सेवादारकाकडून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वागिण व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसेच विविध कलागुणांचे संवर्धन करण्यासाठी आपणांस पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
१) सदर सेवादारकामार्फत तयार करण्यात आलेले 'सेलिब्रिटी स्कूल' हे एक ऑनलाईन डिजिटल इंटरएक्टिव्ह प्लॅटफॉर्म आहे जिथे सेलिब्रिटिज स्वतःचे सराव तंत्र (रियाझ टेक्निक), परफॉर्मन्स स्टाईल, सिक्रेट टिप्स इत्यादी व्हिडिओज् च्या माध्यमातून शिकविणार आहेत.
२)‘सेलिब्रिटी स्कूल' या ऑनलाईन डिजिटल इंटरएक्टिव्ह प्लॅटफॉर्मवर व्यक्तिमत्त्व विकास आणि आर्टस संबंधित १८ सेलिब्रिटीचे कोर्स आहेत. उदाहरणार्थ,
(1) आशा भोसले यांचे गायन कोर्स्
(२) नवाजुद्दीन सिद्दीकीचा यांचे अभिनय कोर्स्
(३) गणेश आचार्य यांचे नृत्य कोर्स्
(४)शान यांचे गायन कोर्स्
(५)डबू रतनानी यांचे फोटोग्राफी कोर्स्
(६) साबिरा मर्चंट यांचे कम्युनिकेशन स्किल्स कोर्स
(७) सुधीर शिवराम यांचे वन्यजीव (Wildlife) फोटोग्राफी कोर्स्
(८) मेरी कोम यांचे फिटनेस कोर्स्
(९)रणवीर ब्रार यांचे पाककला (Cooking) कोर्स्
(१०) मधुर भांडारकर यांचे दिग्दर्शन (Direction) कोर्स्
(११) मान्या सिंग यांचे आत्मविश्वास वृद्धी (Confidence Building) कोर्स्
(१२) ओजस रजानी यांचे Make up and Hair कोर्स्
(१३) हुसैन जैदी यांचे Writing बाबत कोर्स
(१४) विवेक भार्गव यांचे Digital Age १०१ बाबत कोर्स्
(१५) डॉ. कुलजित उप्पल यांचे Image Management कोर्स्
(१६) तन्वी भट यांचे Public Speaking कोर्स्
(१७) प्रसाद कापरे यांचे Luxury Brand Management कोर्स्
(१८) तानाजी जाधव यांचे Social Work बाबत कोर्स्
- सेलिब्रिटी स्कूल या ऑनलाईन डिजिटल इंटरएक्टिव्ह प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्याने यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचे संबंधित सेलिब्रिटीची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र सदर संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यासाठी खालील गोष्टी विद्यार्थ्यांकडून करुन घ्याव्यात.
1. मोबाईलवर Google Playstore / Appstore मधून celebrity school app डाउनलोड करण्यात यावे.
2.Continue with Email या option वर क्लिक करावे. त्यासाठी Email Address साठी school@maharashtra.in हा Email ID आणि Password 123456 असे नोंदवून Login करावे.
3.Login केल्यानंतर १८ सेलिब्रिटी कोर्सेस उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार ट्रेनिंग व्हिडिओ बघावेत.
4.विद्यार्थ्यांना याचा वापर करताना काही अडचणी आल्यास ९८३३८९७६७८ / ९०२९०२३०९० या Helpline वर संपर्क करावा अथवा अॅपमध्ये उपलब्ध असणाऱ्या Community Chat द्वारे देखील विद्यार्थ्यांच्या शंकाचे निराकरण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
5.Celebrity school app मध्ये प्रोफाइल सेक्शन मध्ये विद्यार्थ्याने स्वतःचे नाव ऍड करुन सेलिब्रिटी ने हस्ताक्षर केलेली सर्टिफेकेट डाउनलोड करावी.
६. विद्यार्थ्याने स्वत:चा गायन ( Singing) / अभिनय (Acting) / नृत्य (Dance ) याचे व्हिडिओ ॲपमधील Competition या Option वर Click करून अपलोड करावा अथवा ९०२९०२३०९० या क्रमांकावर WhatsApp करावा.
७. विद्यार्थ्यांनी स्वतःचे अपलोड केलेल्या व्हिडीओज् चे जिल्हा व राज्य स्तरावर मूल्यमापन करून पारितोषिके देण्यात येतील.
उपरोक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार दिनांक ३१/०३/२०२४ पर्यंत या कार्यक्रमाची अंमलबजावणी पूर्ण करण्याकामी वर नमूद सदर संस्थेस संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून / शिक्षकाकडून सहकार्य करण्यासाठी आपल्या स्तरावरून निर्देशित करण्यात यावे.
उपरोक्त प्रमाणे नमूद Scope of Work नुसार संबंधित संस्थेकडून योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा आपल्या स्तरावरून जिल्ह्यातील संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत संबंधित शाळेस भेट देऊन योग्य पद्धतीने होत असल्याची खातरजमा करावी. याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल या कार्यालयास सादर
करावा.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .