प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी/केळी उपलब्ध करुन देणेकरीता अनुदान मागणी करणे बाबत.
२६ मार्च २०२४ च्या परिपत्रकानुसार....
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी / केळी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संचालनालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत येणाऱ्या शाळांकरीता रक्कम रु. ५/- प्रति आठवडा याप्रमाणे अंडी व केळी उपलब्ध करुन देण्याकरीता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. माहे जानेवारी, २०२४ पासून नॅशनल एग्ज कोऑर्डिनेशन कमिटी यांचे संकेतस्थळावरील सरासरी दरानुसार अंडी दर जानेवारी, २०२४ व फेब्रुवारी, २०२४ या दोन महिन्यांकरीता निश्चित केलेले आहेत.
अंडी/केळी अनुदान मागणी करतांना संदर्भ २ मधील पत्रामध्ये विस्तृत सूचना देण्यात आलेल्या आहेत, तथापि आपल्या कार्यालयाने सादर केलेल्या मागणीमध्ये १०० टक्के पटसंखेच्या प्रमाणात अंडी आणि केळी करीता रक्कम रु. ६.००/- या प्रमाणे अनुदान मागणी करणेत आलेली आहे, सदरची बाब वस्तुनिष्ठ आढळून येत नाही. याअनुषंगाने आपणास खालील अधिकची माहिती सादर करणेचे निर्देश देण्यात येत आहे.
१. संचालनालयाकडील संदर्भिय निर्देश पत्रामध्ये नमूद मुद्दा क्रमांक २ आणि ३ नुसार प्रत्यक्ष लाभार्थी संख्या आणि अंडी अथवा केळी कोणत्या आठवड्यामध्ये दिली आहेत, याप्रमाणे संबंधित मुख्याध्यापक यांचेकडून प्रमाणित करुन घेतलेबाबतचा अहवाल.
२. संचालनालयाकडील संदर्भिय निर्देश पत्रामध्ये नमूद मुद्दा क्रमांक ५ अन्वये, केवळ अंडी उपलब्ध करुन दिलेल्या दिवसांची परिगणना रक्कम रु. ६/- प्रमाणे करावयाची आहे, केळी अथवा इतर फळ दिले असल्यास परिगणना रु. ५/- या प्रमाणे करण्यात यावी.
३. संचालनालयाकडील संदर्भिय निर्देश पत्रामध्ये नमूद मुद्दा क्रमांक ६ नुसार अनुदानाची मागणी केलेल्या शाळांनी दैनंदिन उपस्थितीची माहिती एमडीएम पोर्टलवर भरले असलेबाबतची खात्री केली आहे किंवा कसे, तसेच याचा तपशिल सोबत जोडण्यात यावा.
उक्त नमूद मुद्द्यांनुसार आपण केलेल्या मागणीची पुनश्च पडताळणी करुन मागणी फेरसादर करणेत यावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .