विशेष गरजा असणा-या (दिव्यांग) CWSN मुलांचा तपशील व प्रकार
1 ) Blindness: पुर्णत: अंध.
ज्याला अजिबात दृष्टी नाही असा.
2) Low Vision : अंशत: अंध.
उपचारानंतरही ज्यांच्या दृष्टीमध्ये सुधारणा होत नाही / कमी दिसणे असे विद्यार्थी किंवा नियमित पाठ्यपुस्तके वाचतांना अडचणी निर्माण होतात असे विद्यार्थी
3) Hearing Impairment (Deaf and Hard of Hearing): कर्णबधिर
ज्याला काहीही ऐकू येत नाही असा विद्यार्थी हळू आवाजात बोललेले ऐकण्यास समस्या निर्माण होणारे विद्यार्थी. आवाजाचा कुठलाही भास न होणारा व त्यास प्रतिसाद न देणारा विद्यार्थी
4) Speech and Language Disability : वाचादोष आणि भाषिक दोष
बोलतांना अडखळत बोलणे. जिभ जाड असणे. जिभेला शेंडा नसणे, तोतडे बोलणे. वाचतांना उच्चार स्पष्ट नसणे. स्वर व्यंजनाचा उच्चार व्यवस्थित करता न येणे.
(5) Locomotor Disability (Orthopedic ) : अस्थिव्यंग
शारिरिक हालचालीस अक्षम असणे, हात किंवा पाय निष्क्रिय होणे, पोलिओचा आजार असणे, जन्मताच पाय वाकळे असणे (club foot) 6) Mental Illness : मानसिक आजार
स्वतःशीच बोलणे, अभिव्यक्त / भिती वाटणे, नेहमी गुमसुम राहाणे. भावनिक विकृती असणे.
7) Specific Learning Disability : अध्ययन अक्षम
वाचन, लेखन व गणितीय प्रक्रियेत दोष असणे. अभ्यासात मागे रहाणे, समजण्यात अडचणी असणे, आकलन करण्यास अवघड |8) Cerebral Palsy : मेंदूचा पक्षाघात
मेंदूला आघात झाल्यामुळे हात पायात वाक / आकड असणे, मेंदूचा शरीरावर ताबा न रहाणे, हालचाल प्रक्रिया कमी असणे
9) Autism Spectrum Disorder : स्वमग्न / आत्ममग्न
स्वतःच्या विश्वात हरवलेले असणे, समाजात कमी मिसळणे, एकलकोंडेपणा असणे, अवधान केंद्रीत न होणे इत्यादी
10) Multiple Disability including deaf, blindness : बहुविकलांग
शरीरात एकापेक्षा जास्त विकलांगता असणे म्हणजे बहुविलकांग होय उदा. अंध सोबत बधिरत्व, मतिमंदत्वासोबत वाचनदोष, इत्यादी
11) Leprosy Cured Persons : कुष्ठरोग निवारीत
त्वचेच्या रंगात फरक पडणे, विशिष्ठ प्रकारचे चट्टे त्वचेवर निर्माण होणे, हलक्या पिवळ्या रंगाचे चटके निर्माण होणे, चट्ट्यांची संख्या एक किंवा अनेक असणे, त्वचेची संवदेना नष्ट होणे, बोटे झडणे.
12) Dwarfism : ठेंगणा (शारिरिक वाढ खुंटणे)
व्यक्तीची वाढ न होणे, सामान्य मुलांच्या तुलनेत उंची कमी असणे
13) Intellectual Disability (MR) : मतिमंद / गतिमंद / बौध्दीक अक्षम अध्ययन अध्यापन करण्यास समस्या असणे, दैनंदिन क्रिया, सामाजिक व्यवहार करण्यास असमर्थ असणे, समजणे आणि बोलणे यास असमर्थ असणे, वर्तणुक समस्या असणे, सर्व सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा बौध्दीक क्षमता कमी असणे
14) Muscular Dystrophy : स्नायुंची विकृती
प्रथम दोन्ही पाय प्रभावित होणे, नंतर शरीराचा वरील भाग प्रभावित होणे, श्वसन यंत्रणाही प्रभावित होणे, बालक उभे होत असतांना हाताचा व गुडध्याचा आधार घेऊन उभे होणे, शरीरातील मासपेशी कमकुवत होणे व विकृती निर्माण होणे
15) Chronic Neurological Conditions : मज्जासंस्थेचा तिव्र आजार
प्रथम दोन्ही पाय प्रभावित होणे, नंतर शरीराचा वरील भाग प्रभावित होणे, श्वसन यंत्रणाही प्रभावित होणे, बालक उभे होत असतांना
हाताचा व गुडध्याचा आधार घेऊन उभे होणे, शरीरातील मासपेशी कमकुवत होणे व विकृती निर्माण होणे
16) Multiple Sclerosis : मल्टीपल स्क्लेरोसिस / बहुविध उत्तक दृढन
मस्तिष्क आणि पाठीचा कणा प्रभावित होऊन समस्या निर्माण होतात. मासपेशी मध्ये कमजोरी, दृष्टीदोष, ताळमेळ राखता न येणे
17) Thalassemia : ॲलेसिमीया / रक्तविकार / कॅन्सर
शरीरात रक्ताची कमतरता असते. रक्तामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी होणे.
18) Hemophilia : हिमोफिलिया / रक्तस्त्राव बंद न होणे
जखम झाल्यानंतर रक्तस्त्राव बंद न होणे, नाक डोळ्यातून रक्तस्त्रात होणे, खूप जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणे
19) Sickle Cell Disease : सिकलसेल आजार
रक्ताची कमतरता असणे, वारंवार रक्त द्यावे लाणे, त्यामुळे शरीरावर व अवयंवावर परिणाम होणे.
20) Acid Attack Victim : ॲसिड अटॅक / तेजाब हमला
अॅसिड हल्ल्यामुळे व्यक्तीच्या शरीराचे अवयव, हात, पाय, डोळे, शरीर इत्यादी प्रभावीत होऊन शरीरावर परिणाम होतात.
21 ) Parkinson's Disease : पार्कीन्सन आजार / लकवा
शरीराचे कोणतेही भाग / अवयव निष्क्रिय होणे, हात पायाच्या मासपेशी आकुंचन पावणे.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .