"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानाच्या राज्यस्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रमाबाबत

 "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानाच्या  राज्यस्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रमाबाबत



मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत 

राज्यस्तर,विभागस्तर जिल्हास्तर अंतिम निकाल







शिक्षण आयुक्तांनी दि 3 मार्च २०२४ रोजी परिपत्रक व  कार्यक्रमपत्रिका निर्गमित करून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानाच्या राज्यस्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रमाबाबत सूचित केले आहे कि.....

विषय : "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानाच्या

राज्यस्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत...

आपणास कल्पना आहे की राज्यात "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" हे अभियान खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले असून राज्यातील १०३३१२ शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम राज्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे घेतले आहेत.

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आलेले आहे.

या संदर्भातील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राज्य पातळीवरील, विभाग पातळीवरील व राज्याच्या राजधानी मुंबई मधील विजेत्या शाळांसाठीचा पारितोषिक वितरण समारंभ मा.मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (वित्त), मा. उपमुख्यमंत्री (गृह) व मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ५ मार्च २०२४ रोजी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील सोबत जोडण्यात येत आहे.

तरी "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानात राज्यस्तरावर, विभाग स्तरावर · राज्याच्या राजधानी मुंबईमधील व राज्यातील अ व ब महानगरपालिका क्षेत्रांमधील विजेत्या नमूद ६६ शाळांच्या पारितोषिक वितरण समारंभास या विजेत्या शाळांमधील प्रत्येकी कमाल १० व्यक्ती उपस्थित राहू शकतील.

कृपया आपण आपल्या स्तरावरून या विजेत्या शाळांना याबाबत सूचित करावे. आपणही या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती.

कर्यक्रम पत्रिका व निवड झालेल्या शाळांची यादी download करण्यासाठी येथे click करा.

download

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.