सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना.

 सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना


आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

शासनाने दि १६ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करून निर्देश दिले आहेत कि....

प्रस्तावना :-

सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना उपरोक्त दिनांक ३० जानेवारी, २०१९ च्या शासन अधिसूचनेन्वये दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतनश्रेणी विहित करण्यात आली आहे.

मा. न्यायालयाच्या आदेशानुसार, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने तपासणी करुन शिफारशी करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समितीची स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करुन त्याबाबत शिफारशी करण्याकरीता पुढीलप्रमाणे वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना करण्यात येत आहे.

१. श्री. मुकेश खुल्लर

राज्य शासनाचे सेवा निवृत्त अपर मुख्य सचिव

अध्यक्ष


सदस्य

२. अपर मुख्य सचिव (सेवा)

सामान्य प्रशासन विभाग

३. अपर मुख्य सचिव (व्यय)

वित्त विभाग

सदस्य

सदर समितीच्या कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहतील :-


(अ) ज्या संवर्गाच्या संदर्भात न्यायालयाने उपरोक्त प्रमाणे आदेश दिले असतील अशा संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रुटींचा सखोल अभ्यास करुन अहवाल सादर करणे

(ब) प्रशासकीय विभागांकडून एखादया विशिष्ट संवर्गांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीमधील त्रुटी संबंधित सादर होणाऱ्या प्रकरणांची तपासणी करणे.

(क) समितीने नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत आपला अहवाल शासनास सादर करण्यात यावा. या कामासाठी समिती आपली कार्यपध्दती स्वतः ठरवील.

3. एखादया विशिष्ट संवर्गांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीमध्ये त्रुटी आहेत असे प्रशासकीय विभागाच्या सचिवांना / विभागप्रमुखांना ज्या प्रकरणी वाटेल ती प्रकरणे त्यांनी केंद्र शासनाकडील समतुल्य पद त्यांची सुधारणापूर्व वेतनश्रेणी आणि सुधारीत वेतनश्रेणी सेवाप्रवेश नियम, कर्तव्ये व जबाबदाऱ्या इत्यादी बाबी विचारात घेऊन तपासाव्यात व तपासणीअंती अशा प्रकरणामध्ये त्रुटी आहे अशी त्यांची खातरजमा झाल्यास, त्यासंबंधीचे प्रस्ताव (४ प्रतीत) योग्य त्या समर्थनासह हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून २ महिन्याच्या आत समितीकडे पाठवावे.

४. शासकीय कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेस / महासंघास काही संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटी बाबत निवेदने सादर करावयाची झाल्यास ती संबंधित प्रशासकीय विभागामार्फत सादर करावीत व प्रशासकीय विभागाने या निवेदनांची तपासणी करुन वरील परिच्छेद क्र.४ मध्ये नमूद केल्यानुसार आपल्या शिफारशीसह प्रस्ताव समितीच्या विचारार्थ सादर करावेत.

५. समिती आपल्या कामासाठी स्वत:ची कार्यपध्दती ठरवील आणि नियुक्तीच्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या कालावधीत आपला अहवाल शासनास सादर करील.

अधिक माहिती साठी GR download करण्यासाठी येथे click करा.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

10 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. वरिष्ठ वेतन श्रेणी लावताना डीएड शिक्षकाचे मूळ पगारात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे फक्त सातशे रुपये वाढतात. व सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वरिष्ठ वेतन श्रेणी डीएड शिक्षकांना लागल्यास मूळ पगारात चौदाशे रुपयाची वाढ होत होती तरी सातव्या वेतन आयोगाच्या वार्षिक वेतन वाढीचा तुलनेने सुद्धा वरिष्ठ वेतनश्रेणी वाढीची रक्कम कमी आहे तरी सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे जी वरिष्ठ वेतनश्रेणी लागल्यानंतर चौदाशे रुपयांची वाढ होत होती तेवढीच वाढ सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वरिष्ठ वेतनश्रेणी लागल्यानंतर व्हायला हवी हीच आमची मागणी.

    उत्तर द्याहटवा
  2. सुधाकर खंडू पारधी१७ मार्च, २०२४ रोजी ९:१८ AM

    सातव्या वेतन आयोगात डीएड शिक्षकाला बारा वर्षानंतर जी वरिष्ठ वेतनश्रेणी लागते त्यात फक्त सातशे रुपयांची वाढ होते परंतु सहाव्या वेतन आयोगात ही वाढ चौदाशे रुपये होत होती तरी सातवा वेतन आयोगाच्या वार्षिक वेतन वाढीची रक्कम यांच्या तुलनेने बारा वर्षे व नंतर लागणारी रक्कम ही तुलनेने खूपच कमी आहे तरी सहाव्या वेतन आयोगात वरिष्ठ वेतनश्रेणी लागल्यानंतर जी चौदाशे रुपयांची वाढ होत होती तीच वाढ सातव्या वेतन आयोगात वरिष्ठ वेतन श्रेणी लागल्यानंतर व्हायला हवी हीच आमची मागणी

    उत्तर द्याहटवा
  3. सातव्या वेतन आयोगामध्ये बीएड ची वरिष्ठ वेतन श्रेणी देताना फक्त शंभर रुपये ग्रेड पे मध्ये वाढ होते.

    उत्तर द्याहटवा
  4. सातवा वेतन आयोग मध्ये पदवीधर शिक्षकांच्या पे मॅट्रिक्स मध्ये चूक आहे एकच दिवशी नियुक्त झालेल्या शिक्षकाच्या मूळ वेतनात १००₹ पदवीधर चे कमी व स. शि.चे जास्त आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सातव्या वेतन आयोगामध्ये पदविधर शिक्षकांच्या वेतन त्रुटी मध्ये तफावत.
      1 जानेवारी 2016 ला कनिष्ठ कर्मचारी याचे मुळ बेसिक 16500 आणि ग्रेट पे 4200 आहे
      1 जानेवारी 2016 ला वरिष्ठ कर्मचारी यांचे मुळ बेसिक 16520 आणि ग्रेट पे 4300 आहे
      सातव्या वेतन आयोगात वेतन निश्चिती करतांनी कनिष्ठ कर्मचारी यांचे मुळ बेसिक आणि ग्रेट पे कमी असतांना सुद्धा वरिष्ठ कर्मचारी यांचे वेतन कमी निघतात.
      वरिष्ठ कर्मचारी यांच्या वेतन त्रुटी शासनाने लवकर दुर करून सुधारित आदेश काढावा.
      श्री पंढरी आत्माराम तडस पदविधर अध्यापक
      जि प उच्च प्राथमिक शाळा टेंभा
      प स हिंगणघाट जि प वर्धा

      हटवा
  5. एकाच दिवशी नेमणूक झालेल्या दोन शिक्षक यांच्या मूळ वेतनात सातव्या वेतन आयोगातील वेतन निश्चिती करताना ज्या शिक्षक 24 वर्षांतील निवड श्रेणी मिळालेल्या शिक्षकाचे मूळ वेतन 100₹ ने कमी आहे

    उत्तर द्याहटवा
  6. B.ed झालेल्या शिक्षकाना निवड श्रेणी दिली जाते पण ज्या मुख्याध्यापकांनी B.Ed केलेले आहे त्यांना काहीच फायदा दिला जात नाही .सहाव्या वेतनात D.Ed आणि B.Ed वेग वेगळी scale दिली जात होती ती सातव्या वेतनात D.Ed आणि B.Ed एक स्कले आहेच

    उत्तर द्याहटवा
  7. वेतन ekavatane हा मुद्दा स्पष्ट नाही केला असे दिसत आहे

    उत्तर द्याहटवा
  8. माझी अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून1993 नेमणूक झाली आहे. 12 उत्तीर्ण ग्रंथपाल प्रमाणपत्र .मी 15 वी appear होते. 15 डेज गॅप देऊन पुन्हा 1 जुलै 1994 अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून नेमणूक झाली. 1997 मी पूर्णवेळ झाले.1999 june मध्ये bilb झाले. माझी ficxation झाले आहे.तरी payunit मान्य करीत नाही.तरी माझे नेमणूक मआण्यातेवर सुधारित बदल करून मला पदवीधर ग्रंथपाल आदेश मिळेल का..

    उत्तर द्याहटवा
  9. प्राथमिक शिक्षक व प्राथमिक पदवाधीर शिक्षक एकाच तारखेस नेमणूक असलेले .
    सातव्या वेतन आयोगात प्राथमिक शिक्षणाचे बेसीक रू.100/- शंभर रुपयांने पूढे आहे .
    तरी प्राथमिक पदवीधर शिक्षकावर अन्याय होत आहे .
    तरी में . साहेबांनी ही प्रा . प . शिक्षकांची त्रुटी दूर करून उपकृत करावे . ही नंम्र विनंती .

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .