सन २०२३-२४ U-DISE प्रणाली मध्ये Dropbox मधील विदयार्थ्यांची माहिती अद्यावत करणेबाबत.

सन २०२३-२४ U-DISE प्रणाली मध्ये Dropbox मधील विदयार्थ्यांची माहिती अद्यावत करणेबाबत.





उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, सन २०२३ २४ U-DISE + प्रणाली मध्ये Dropbox मधील विदयार्थ्यांची माहिती अद्यावत करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

दि २८/२/२०२४ रोजीच्या U-DISE + प्रणाली मधील Drop box अहवालानुसार राज्यामध्ये एकूण १२,४०,६५१ एवढे विदयार्थी Dropbox मध्ये दिसून येत आहेत, म्हणजेच एकूण विदयार्थ्यांच्या तुलनेमध्ये ५.८४% विदयार्थी Dropbox मध्ये आहेत. यामधील बरेच विदयार्थी पोलिटेक्निक, व्यवसायिक शिक्षण, आयटीआय, डिपलोमा प्रवेश घेलेले आहेत, दुबार नोंदणी झालेली आहे त्यामुळे ते Dropbox मध्ये असल्याबाबत शाळांकडून सांगण्यात आले आहे. Dropbox मधील विदयार्थ्यांचा शोध घेऊन माहिती U-DISE + प्रणाली मध्ये अपटेड करण्यासाठी शाळा, तालुका, जिल्हास्तरावर सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सोबत दिलेल्या तक्त्यानुसार सर्व विदयार्थ्यांचा शोध घेऊन माहिती अपडेट करण्यासाठी VC घेवून सुचना देण्यात याव्यात. जेणे करुन जिल्हयातील एक ही विदयार्थी Dropbox / Drop out / Out of School राहणार नाही याची नोंद घेण्यात यावी. याबाबत आपल्या स्तरावरुन शाळांना Drop box मधील माहिती तात्काळ अपटेड करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास ई-मेल द्वारे पाठविण्यात यावा.


अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा





जिल्हयानिहाय व वर्ग निहाय विदयार्थ्यांची संख्या.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.