शिक्षक, पालक, विद्यार्थी, क्षेत्रीय अधिकारी, तज्ज्ञ नागरिक यांची राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण (SCF-SE) निर्मितीच्या अनुषंगाने अभिप्राय / सूचना जाणून घेणेबाबत. Online LINK SCERT

शिक्षक, पालक, विद्यार्थी, क्षेत्रीय अधिकारी, तज्ज्ञ नागरिक यांची राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण (SCF-SE) निर्मितीच्या अनुषंगाने अभिप्राय / सूचना जाणून घेणेबाबत Online LINK





संचालक SCERT पुणे ने परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि.....

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, इयत्ता 3री ते 12 वी इयत्तांसाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण (SCF-SE) निर्मिती बाबत कार्यवाही सुरु आहे. त्यानुसार NCF-SE संदर्भाने आवश्यक बदल करून SCF-SE अंतिम निर्मिती करण्यात येईल.

अध्ययन करून त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्य अभ्यासक्रम आराखडा SCF-SE निर्मिती प्रक्रियेचा भाग म्हणून क्षेत्रीय स्तरावरील परिस्थिती व त्यानुषंगाणे करता येणारे बदल याबाबत अभ्यास करणेसाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, क्षेत्रीय अधिकारी, तज्ज्ञ नागरिक यांची राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण (SCF-SE) निर्मितीबाबत मते / अभिप्राय / सूचना जाणून घेण्यात येणार आहेत.

तरी. याद्वारे सर्व संबंधित यांना आवाहन करण्यात येते कि, SCF-SE तसेच अभ्यासक्रम बाबत विषयनिहाय देण्यात आलेल्या LINK मध्ये आपल्या सूचना पाठवाव्यात.

अभिप्राय नोंदविण्यासाठी LINK सोबत संलग्न

अभिप्राय नोंदवण्याचा कालावधी दिनांक- ०९/०२/२०२४ ते दि. २९/०२/२०२४


गुगल फॉर्म भरण्यासंदर्भांत सर्वसामान्य सूचना

1. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण विकसन संदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.
2. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकीय यंत्रणा यांच्याकडून अभिप्राय घेण्यासाठी सदर फॉर्मची निर्मिती केली आहे.
3. आपल्या अभिप्रायाचा उपयोग राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण निर्मिती करताना होणार आहे. त्यामुळे  आपले अभिप्राय अनमोल असतील. 
4. अध्ययन-अध्यापन करत असलेल्या विषयाशी संबंधित अथवा आवडीच्या विषयासंदर्भात आपले योगदान द्यावे. 
5. सदर फॉर्म भरताना मराठी किंवा इंग्रजी भाषांचा वापर करू शकता.

1. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण -भाषा, गणित, विज्ञान, कला, शारीरिक शिक्षण, सामाजिक शास्त्र, आंतरविद्याशाखीय शिक्षण Online LINK

2. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण-व्यावसायिक शिक्षण Online LINK

3. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण-आंतरसमवाय क्षेत्र (Cross Cutting Theme ) Online LINK 

4. राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण अभिप्राय-शालेय संस्कृती व प्रक्रिया, सहाय्यभूत प्रणाली Online LINK

सौजन्य : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा. 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .