कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविण्याबाबत कार्यवाही करण्यासंदर्भात
मा. न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त समिती कक्ष ,सामान्य प्रशासन विभागाने दि 12 फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार........
संदर्भाधिन शासन निर्णयान्वये (प्रत संलग्न) मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याची सध्याची कार्यपध्दती कायम ठेवून ज्या व्यक्तींची वंशावळ स्पष्ट जुळते त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावेत. या प्रचलित पध्दतीत कोणताही बदल न करता कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदींसंदर्भात वंशावळ सिद्ध करण्यास येत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर सदर वंशावळ सिध्द करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तहसिलस्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन समितीने करावयाच्या कार्यवाहीबाबत निर्देश दिले आहेत.
२.सदर शासन निर्णयातील निदेशांप्रमाणे तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय समिती स्थापन करुन शासन निर्णयान्वये दिलेल्या निदेशांप्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी. असे कळविण्याचे मला निदेश आहे.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा, GR देखील download करू शकता.
कुणबी, मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविण्याबाबत कार्यवाही करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत. २५ जानेवारी २०२४
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .