अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत.
पोर्टल MAHADBT login करण्यासाठी येथे click करा.
मार्गदर्शिका साठी येथे click करा.
समाजकल्याण आयुक्तालयाने निर्गमित केलेल्या दि 1 फेब्रुवारी २०२४ च्या परिपत्रकानुसार......
उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खालील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत.
१.सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
२.इ.९ वी १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
३.साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
४.इ.५ वी ते ७ वी आणि इ.८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ५.माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
६.महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क
वर नमुद केलेल्या सर्व योजनांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करणेकरीता खालीलप्रमाणे कार्यप्रणाली अवलंबण्यात यावी.
१. महाडीबीटी प्रणाली वेब लिंक- https://prematric.mahait.org/Login/Login
२. मुख्याध्यापक लॉगीन तयार करणे- महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्जांच्या नोंदणीसाठी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी यूजर आयडीमध्ये Pre_SE२७XXXXXXXXX_Principal आणि पासवर्डमध्ये Pass@१२३ टाइप करून लॉग इन करावे.
३. शाळेचे प्रोफाईल अद्ययावत करणे- यामध्ये शाळेची, मुख्याध्यापकांची व लिपिकाची माहिती अद्ययावत करावी.
४. विद्यार्थी प्रोफाईल अद्ययावत करणे- यामध्ये विद्यार्थ्याची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी.
५. योजनेची निवड करणे- यामध्ये संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेकरीता अर्ज नोंदणी करणे.
तरी वर नमुद केलेल्या योजनांचे पात्र सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करणेकरीता आपले स्तरावरुन संबंधित सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांना तात्काळ आदेशित करावे. याबाबत मा.आयुक्त महोदय साप्ताहिक बैठकीमध्ये आढावा घेणार आहेत. त्यामुळे सर्व शाळांची १०० टक्के अर्ज नोंदणी होईल याकरीता आपले स्तरावरुन कार्यवाही करावी. याबाबतीत दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .