मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन,इतर खर्च व बँक खात्याचा तपशिल बाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग

मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन,इतर खर्च व बँक खात्याचा तपशिल बाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग 




महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने दि २२ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार......


संदर्भाधीन दि.१७.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविल्यानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुंटुंबाचे सर्वेक्षणाच्या कामकाजामध्ये विभाग, जिल्हा, महानगरपालिका तसेच तालुका व वॉर्डस्तरावर नोडल ऑफ़िसर, असिस्टंट नोडल ऑफ़िसर व नोडल ऑफ़िसर च्या मदतीसाठी नियुक्त लिपीक यांना त्यांच्या मुळ वेतनाच्या ५०% इतके मानधन अदा करण्यात येणार आहे. सर्वेक्षण कामकाजाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांनी केलेल्या कामाची माहिती सॉफ़्टवेअरच्या माध्यमातुन तपासण्याचे काम सुरू आहे. सदर प्रगणकांना त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार अदा करावयाची रक्कम आयोगामार्फ़त निश्चित करून वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

आपल्यामार्फ़त नियुक्त करण्यात आलेल्या उर्वरित विभागीय, जिल्हा, महानगरपालिका, तालुका, वॉर्डस्तरीय अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक व पर्यवेक्षक यांना मानधन देण्याकरिता त्यांची अचुक माहिती खालील नमुन्यात जिल्हा स्तरावरून / महानगरपालिका स्तरावरून आयोगास उपलब्ध करून देण्यात यावी.

तसेच मानधन व इतर रक्कम जमा करण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांचे खालील नमुन्यात बँक खाते तपशिल सादर करावे. मानधन, प्रशिक्षण व स्टेशनरी खर्चाची रक्कम तपासून देय रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात येईल. सदर रकमेचे वाटप करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय / महानगरपालिकास्तरीय नोडल ऑफ़िसर यांची राहील.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा

download Now


टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .