Udise Code म्हणजे काय ? युडायस कोड कसा वाचावा..?

 Udise Code म्हणजे काय ? युडायस कोड कसा वाचावा ?



(वरील लिंक वर फक्त udise कोड व कॅप्टचा captcha टाका )

        Udise पोर्टल हे शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पोर्टल आहे आणि भविष्यात हे पोर्टल खूपच महत्वपूर्ण असणार आहे. Udise पोर्टल व त्यासंबंधित इतर पोर्टलवरील काम करताना असं दिसून येतं की, या 11 अंकी कोडचे वाचन चुकीच्या पद्धतीने केले जाते.
      भारतातील प्रत्येक शाळेला मग ती कोणत्याही माध्यमाची किंवा व्यवस्थापनाची असो, सन 2012-13 पासून एक युनिक कोड दिला जातो त्यास आपण Udise कोड असे म्हणतो.

Udise-Unified District Information System for Education.

    सध्या या सिस्टीममध्ये देशातील 15 लाख शाळा, 97 लाख शिक्षक व 26 कोटी विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध आहे.
     Udise कोड हा 11 अंकी असतो. याचे वाचन कसे करावे याबाबत बऱ्याच शिक्षक बांधवांमध्ये संभ्रमावस्था दिसून येते.11 अंकी Udise कोडचे साधारणपणे 5 भाग किंवा टप्पे पडतात.
     माहितीस्तव आपण जि. प. प्रा. शाळा पवारवस्ती (पिंपळगांव धस) ता.बार्शी जि.सोलापूर या शाळेचे उदाहरण घेऊ.

🍁 शाळेचा Udise-27300209503 🍁
       
📌 पहिला टप्पा-
      यामध्ये पहिला व दुसरा अंक मिळून दोन अंकी राज्याचा कोड दर्शविला जातो. वरील Udise कोडमधील पहिले दोन अंक म्हणजेच 27 हा कोड महाराष्ट्र राज्यासाठी वापरला जातो.
     जम्मू-काश्मीर 01 ते तेलंगणा 36 असे देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांना कोड देण्यात आले आहेत.

📌 दुसरा टप्पा-
      तिसरा व चौथा अंक मिळून दोन अंकी जिल्ह्याचा कोड दर्शविला जातो. वरील Udise कोडमधील 30 हा कोड महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यासाठी वापरला जातो.
     नंदूरबार 01 ते सांगली 35 असे राज्यातील सर्व जिल्ह्यांना कोड देण्यात आले आहेत.

📌 तिसरा टप्पा-
       पाचवा व सहावा अंक मिळून दोन अंकी तालुक्याचा कोड दर्शविला जातो. वरील Udise कोडमधील 02 हा कोड सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यासाठी वापरला जातो.
      अक्कलकोट 01 ते दक्षिण सोलापूर 11 असे सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना कोड देण्यात आले आहेत.

📌 चौथा टप्पा-
      सातवा, आठवा व नववा अंक मिळून तीन अंकी गावाचा कोड दर्शविला जातो. वरील Udise कोडमधील 095 हा कोड सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पिंपळगांव धस या गावासाठी वापरला जातो.
      आगळगांव 001 ते तडवळे 140 असे बार्शी तालुक्यातील सर्व गावांना कोड देण्यात आले आहेत.

📌 पाचवा टप्पा-
      शेवटचे दोन अंक म्हणजेच दहावा व अकरावा अंक मिळून संबंधित गावातील शाळांचा दोन अंकी कोड दर्शविला जातो.
    वरील Udise कोडमधील 03 हा कोड बार्शी तालुक्यातील पिंपळगांव धस या गावातील जि. प. प्रा. शाळा पवारवस्ती (पिंपळगांव धस) या शाळेसाठी वापरला जातो.
     पिंपळगांव धस या गावातील तीन शाळांना पुढीलप्रमाणे Udise कोड देण्यात आले आहेत.
27300209501-जि. प. प्रा. शाळा पिंपळगांव धस.
27300209502-जयमल्हार हायस्कूल, पिंपळगांव धस.
27300209503-जि. प. प्रा. शाळा पवारवस्ती (पिंपळगांव धस).
     अशाप्रकारे पिंपळगांव धस या गावातील तीन शाळांना 01,02,03 असे कोड देण्यात आले आहेत.

    म्हणजेच Udise कोडचे वाचन करताना हा कोड 5 टप्प्यांमध्ये वाचणे आवश्यक आहे.
    वरील उदाहरणातील जि. प. प्रा. शाळा पवारवस्ती (पिंपळगांव धस) ता. बार्शी जि. सोलापूर या शाळेच्या Udise कोडचे वाचन-
        27-30-02-095-03
   अशा प्रकारेच करणे आवश्यक आणि योग्य आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
                श्री.दत्ता पाटील,बार्शी


                      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.