मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानांतर्गत शाळा मूल्यांकनाबाबत...

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानांतर्गत शाळा मूल्यांकनाबाबत



शिक्षण आयुक्तालयाने दि १४ फेब्रुवारी २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि...

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा. सुंदर शाळा" हे अभियान राबविण्यासाठी दि. ३०.११.२०२३ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

२/- या अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरल मधील शाळा पोर्टलव्दारे टॅब उपलब्ध करुन देऊन शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

३/- त्याअनुषंगाने शाळांकडून भरलेल्या माहितीचे केंद्र पातळीवरून मूल्यांकन करून सर्वोत्तम गुणांकन असणारी प्रथक क्रमांकावरील एक शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) ब्लॉक पातळीवर मूल्यांकनासाठी ऑनलाईन प्रणालीमार्फतच पाठविण्यात येईल. याच पध्दतीने जिल्हापातळीवर प्रत्येक ब्लॉकमधून प्रथक क्रमांकाची शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) विभाग पातळीवर प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकाची एक शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) राज्यस्तरावर प्रत्येक विभागातून एक सर्वोत्तम गुण असणारी शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) याप्रमाणे मूल्यांकनासाठी ऑनलाईन प्रणालीमार्फतच पाठविण्यात येईल. तसेच तालुका पातळीवरून पुढे मूल्यांकन करताना शाळांचे लगतच्या स्तरावरुन दिलेले शाळांचे गुण दिसणार नाहीत. या सर्व प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे आपल्या स्तरावरुन स्वतंत्रपणे कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही, याची नोंद घ्यावी. ऑनलाईन प्रणालीव्दारचे सर्व माहिती यामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार असून त्याप्रमाणे दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कामकाज पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.





टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .