इयत्ता पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत शासन निर्णय दि. ०७ डिसेंबर २०२३ नुसार अंमलबजावणी करणेबाबत ...
आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.
SCERT ने दि २९ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार
संदर्भ :-
१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९
२. शासन निर्णय क्र. पीआरई/२०१०/(१३६) १०/प्राशि- ५, दि. २० ऑगस्ट २०१०
३ .महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ दि २०११ ऑक्टोबर ११. ४ .शासन निर्णय क्र ६ .डी.एस/१७/११८/२०१७/ संकीर्ण . दि १६ . ऑक्टोबर २०१८
५ .बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम) सुधारणा, २०१९
दि. ११ जानेवारी २०१९
६. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०२३ (सुधारणा) दि २०२३ मे २९ .
७ .शासन निर्णय क्र/२७६प्रक्र / २०२२ - आरटी ई. एस दि १.डी.०७ डिसेंबर २०२३
८. या कार्यालयाचे पत्र क्र. जा. क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन पाचवी आठवी / परीक्षासचूना-२०२३/ २४/०६२९७ दि. २८ डिसेंबर २०२३
९. या कार्यालयाचे पत्र क्र.जा.क्र.रा.शै. सं.प्र.प.म./वि.वाटप /आस्था- १/२/२०२३/०८९७ दि. २०.०२.२०२४
उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम २०२३ ( सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता ५ वी व ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन पद्धती २०२३-२४ पासून लागू करणेबाबत संदर्भ क्र. ७ नुसार निश्चित करणेत आलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार अंमलबजावणी संदर्भात नियोजन करणे आवश्यक आहे.
- त्याअनुषंगाने संदर्भ क्र. ७ मध्ये नमूद केल्यानुसार राज्य नियंत्रण समिती गठीत करणेत आलेली आहे.
- संदर्भ क्रमांक ८ अन्वये आपणास सनियंत्रण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त मधील सूचना व संदर्भ क्र.७ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाहीची अंमलबजावणी करणेबाबत कळविण्यात आले होते.
- संदर्भ क्रमांक ८ अन्वये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांना इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून पुरविण्यात येतील असेही कळविण्यात आले होते.
- तथापि संदर्भ क्र. ७ व ९ अन्वये शासन निर्णयानुसार सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळास्तरावर तयार करणेत याव्यात असे नमूद केलेले असल्याने इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करणेबाबत आपल्या अधिनिस्त सर्व शाळांना अवगत करावे.
इयत्ता ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव होणेकरिता परिषदेच्या वेबसाईटवर नमुना सराव प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते अपलोड केलेले आहेत. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी त्यांचे स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करणे तसेच
- संदर्भ क्र. ७ अन्वये शासन निर्णयानुसार इयत्ता ५ वी व ८ वी च्या वार्षिक परीक्षेबाबत कार्यवाही करणेबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना अवगत करावे.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .