10th-Exam Precautions: दहावी बोर्ड परीक्षेला जाताना घ्यावयाची काळजी : विद्यार्थ्यांनी या 25 बाबी आवश्य वाचाच.....

दहावी बोर्ड परीक्षेला जाताना घ्यावयाची काळजी  

विद्यार्थ्यांनी या 25 बाबी आवश्य वाचाच


  • परीक्षेसाठी आवश्यक साहित्य - 2 पेन , काहीही न लिहिलेले नवीन पॅड शक्यतो पारदर्शक असेल तर अतिशय उत्तम, कंपास बॉक्स आणि परीक्षा दालनात प्रवेशासाठी आवश्यक असणारे रिसीट , आयडेंटिटी कार्ड आपल्या जवळ असावे.


  • परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कमरेचा पट्टा, मोबाईल, डिजिटल घड्याळ, पैशाचे पाकीट, पायातील चप्पल किंवा बूट बाहेर काढून ठेवावे. रिसीट वरील महत्त्वाच्या बाबी अगोदरच वाचलेल्या असाव्यात.


  • रिसीट आणि आयडेंटिटी कार्ड शिवाय इतर कोणत्याही प्रकारचा लिखित मजकूर असलेला कागद किंवा कोरा कागद आपल्याजवळ असू नये. कच्चे लिखाण करण्यासाठी मुख्य उत्तर पत्रिकेच्या शेवटचे पान तुम्ही वापरू शकता. त्यावरती कच्चे काम असे लिहावे. शेवटी न विसरता ते खोडावे किंवा त्याच्यावरती तिरकी रेष मारावी

  • विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय गणवेशात असावे.

  • उष्णतेचे दिवस असल्यामुळे पाण्याची बॉटल आणि लिखाण करताना हाताला घाम येऊ शकतो म्हणून स्वच्छ हात रुमाल बरोबर असावा.

  • परीक्षा दालनामधील आपल्या बैठकीसाठी उपलब्ध असणाऱ्या बेंच वरती अगोदरच काही लिहिले असेल  किंवा कागद -कपटे,पुस्तके, वह्या असतील तर ते पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणावे.

  • उत्तर पत्रिका मिळाल्यानंतर स्वच्छ अक्षरात त्यावरील आवश्यक मजकूर लिहून घ्यावा. उदा. परीक्षा केंद्र क्रमांक  5703, आपला बैठक क्रमांक अंकात व अक्षरात न चुकता लिहावा, आपली स्वाक्षरी आपल्याला दिलेल्या जागेतच करावी पर्यवेक्षकांची स्वाक्षरी त्यांना दिलेल्या जागेत ते करतील. दुसऱ्या भागामधील मजकूर जसा दिनांक, विषय ,उत्तर लेखनाची भाषा इत्यादी बाबी काळजीपूर्वक पूर्ण कराव्यात. पुरवणी घेतल्यास मजकूर त्यावरतीही न चुकता सुरुवातीलाच लिहावा.

  • उत्तर पत्रिके वरती दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

  •  पर्यवेक्षकांच्या मदतीने आपल्या बैठक क्रमांकाचे बारकोड स्टिकर मुख्य उत्तर पत्रिकेवरती चिटकवून घ्यावे.
  •  मुख्य प्रश्न क्रमांक लिहिण्यासाठी प्रत्येक पानावरती सुरुवातीला चौकोन दिलेले असतात. उपप्रश्न अनुक्रमांक लिहिण्यासाठी आपण समास मध्ये रेषा मारू शकता. डाव्या आणि उजव्या बाजूला योग्य समाज सोडावा. डाव्या बाजूच्या समासामध्ये पेपर तपासणीसास चूक/ बरोबर टीका करण्यासाठी आणि गुण लिहिण्यासाठी पुरेसा जागा ठेवावा.

  • प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ती काळजीपूर्वक वाचावी. एखाद्या प्रश्नाचे उत्तर आठवत नसल्यास चिंता करू नये तो प्रश्न पार्किंग मध्ये ठेवावा, कारण पुन्हा पुन्हा तो प्रश्न वाचल्यास त्याचा अर्थ तुम्हाला समजणार आहे आणि वर्षभरात तुम्ही त्याविषयी जे वाचन केले, श्रवण केले किंवा शिक्षकांच्या कडून ऐकले ते आठवणार आहे यावरती विश्वास ठेवा.

  • अशामुळे गोंधळून न जाता चिंता वाटत असेल, काळजी वाटत असेल तर दीर्घ श्वसन करावे (दीर्घश्वास घेऊन रोखून धरून हळूहळू सोडावा) यामुळे तुमच्या डोळ्यासमोर अंधारी येणार नाही किंवा तुम्हाला चक्कर येणार नाही.

  •  उत्तरपत्रिका लिहिताना निळा किंवा काळा पेन वापरावा  लाल, हिरवा, पिवळा अशा इतर रंगाचे पेन उत्तरपत्रिका लिहीण्यासाठी वापरू नयेत.

  • उत्तर पत्रिका लिहिताना स्वच्छ अक्षरात लिहा. एखादा शब्द चुकल्यास फार जास्त खाडाखोड न करता चुकीच्या शब्दावरती एक आडवी रेष मारा व दुरुस्त शब्द त्याच्यापुढे लिहा.

  • उत्तर पत्रिकेच्या प्रत्येक पानावरती वरील मार्जिन मध्ये पेपर तपासणीसास गुण लिहिण्यासाठी जागा दिलेली असते त्यामध्ये आपण काही लिहायचे नाही. त्यांना गुण लिहिणे सोपे व्हावे म्हणून नवीन प्रश्न नवीन पानावरती सोडवावा.

  • पेपर सोडवून झाल्यानंतर उत्तर पत्रिका काळजीपूर्वक वाचावी प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकले असल्याची खात्री करावी.

  •  प्रश्नपत्रिका तील सर्व प्रश्न सोडवावेत.शेवटी जे प्रश्न सोडवता आले नाहीत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा त्या प्रश्नांचा क्रमांक व  उपक्रमांक न विसरता टाकावा. प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या प्रश्नांचे गुण बोर्ड देत असते पण आपण त्या प्रश्नाचा क्रमांक लिहायला हवा.

  •  शेवटी वेळ असल्यास उत्तरपत्रिकेतील रिकाम्या राहिलेल्या  आर्ध्या व पूर्ण पानांच्या वरती निळ्या पेनाने तिरक्या रेषा माराव्यात.


  •  काही चुकीचे वाटल्यास पर्यवेक्षकांशी त्याबाबत तुम्ही चर्चा करू शकता गोंधळून किंवा भिऊन जाण्याची गरज नाही.

 चला तर मग भयमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा देऊयात.तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि परीक्षा सोपी जावो यासाठी प्रार्थना.Best of Luck .धन्यवाद.


श्री. बी. डी. दळवी सर
मुख्याध्यापक
मा.उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय असळज 
तालुका-गगनबावडा, जिल्हा-कोल्हापूर. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .