सन २०२३ - २४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, शिक्षक व विद्यार्थी पोर्टलचे काम पूर्ण करणे तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आधार व्हॅलीडेशन करून ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी संख्या कमी करणेबाबत.

 सन २०२३ - २४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, शिक्षक व विद्यार्थी पोर्टलचे काम पूर्ण करणे तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आधार व्हॅलीडेशन करून ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी संख्या कमी करणेबाबत.




MPSP ने दि २४ जानेवारी २०२४ रिजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि 

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये राज्यातील सर्व शाळांनी सन २०२३ - २४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, शिक्षक व विद्यार्थी पोर्टलचे काम १००% करणेबाबत आपण पत्राव्दारे, Zoom Meeting घेऊन व व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून वारंवार कळविण्यात आले आहे.

तरी देखील राज्यातील शासकीय, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील युडायस प्लसची माहिती संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी अद्यापही पूर्ण केलेली नाही.

राज्यातील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणेसाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय Adhar Validation Report नियमितपणे पाठविण्यात येत आहे. परंतू Adhar Validation चे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. याबाबत केंद्र शासनाकडूनही वारंवार पाठपुरावा केला जात आहे. तरी आपल्या जिल्हयातील संबंधित सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांकडून उर्वरित शिक्षक व विद्यार्थी यांचे Adhar Validation चे काम दि.३१/०१/२०२४ पर्यंत पूर्ण करून घ्यावे.

आपणास ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी संख्या कमी करण्याकरिता कळविण्यात आले आहे मात्र अनेक शाळांचा ड्रॉप बॉक्स अद्यापही शून्य झालेला दिसत नाही यासाठी आपल्या स्तरावरून कॅम्प घेऊन मुख्याध्यापकांकडून ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी त्वरित कमी करून घ्यावे अन्यथा आपल्या जिल्हयाच्या Performance Grading Index गुणांवर याचा विपरित परिणाम होईल त्यामुळे राज्याच्या शैक्षणिक निर्देशकांमध्ये (PGI) घट होईल.

आहेत.

याशिवाय केंद्र शासनाच्या दि. २२ जानेवारी, २०२४ च्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे

  • सन २०२३-२४ करिता युडायस प्लस डेटाचा स्नॅपशॉट दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११ वाजता घेण्यात येईल.
  • दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी डेटा पूर्ण करण्याच्या व तपासून खात्री करून घेण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
उपरोक्त सूचनांनुसार दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजीचा युडायस प्लस डेटा प्रमाणित करणेकरिता वापर करण्यात येईल.
  • ज्या शाळांचा डेटा अपूर्ण भरलेला असेल त्या शाळांचा संपूर्ण डेटा दि. ३१ जानेवारी, २०२४ नंतर सिस्टीमद्वारे पूर्णपणे डिलिट करण्यात येईल.
  • दि. ३१ जानेवारी, २०२४ नंतर डेटामधील कोणतेही बदल अॅप्लिकेशन रिअल टाइममध्ये अपडेट होईल. परंतु सन २०२३ - २४ च्या डेटासाठी सदर अपडेट विचारात घेतले जाणार नाही.
  • युडायस प्लस डेटामध्ये कोणतेही बदल तांत्रिक टीमद्वारे दि. ३१ जानेवारी, २०२४ नंतर केले जाणार नाहीत.

तरी आपल्या स्तरावरून दि. ३१ जानेवारी, २०२४ पूर्वी मुख्याध्यापकांकडून युडायस प्लस सन २०२३-२४ पोर्टलवरील संपूर्ण डेटा भरून घ्यावा.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.

download


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.