शालार्थ प्रणालीमध्ये खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या थकीत व इतर देयके ऑनलाईन काढण्याची सुविधा देणेबाबत.
उपरोक्त विषयी खालील मुद्यांच्या अनुषंगाने शालार्थ प्रणाली मध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणे.
१. थकीत देयके खाजगी शाळांच्याबाबत संचालनालय स्तरावरुन ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, जिल्हा परिषद शाळांच्याबाबत जिल्हास्तरावरील सक्षम प्राधिकारी जसे की, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व साधारण सभा इ. मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन २०२३ २४ या आर्थिक वर्षात थकीत देयके ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
२. अंशतः अनुदानित शाळेतील २० टक्के ४० टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा याच आर्थिक वर्षामध्ये सदर टप्पा वाढ झाली व यावाढीव टप्याचा फरक अदा करण्याचे बाकी असल्यास अदा देय फरक ऑनलाईन मधून अदा करताना प्रलंबित थकीत देयके प्रमाणे गृहीत धरुन हा फरक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
३. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा २ व ३ हप्ता व इतर थकीत देयके शालार्थ प्रणाली द्वारे ऑनलाईन मधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
४. सन २०२३ - २४ याच आर्थिक वर्षातील थकीत देयके प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे शालार्थ प्रणाली ऑनलाईन सुविधा देण्यात यावी. पुढील वर्षापासून थकीत देयके हे डीडीओ १, डीडीओ २,ओ ३, या चॅनेल द्वारे ऑनलाईन सुविधा देण्यात यावी.
५. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाची अनुशेय थकबाकी अदा करताना पूर्व तपासणीच्या अभावी काही थकबाकी चुकीने परिगणित झाले असल्यास अशा प्रकरणात शालार्थ प्रणाली मध्ये Adit option DDO - 1 ला देणे बाबत सुविधा उपलब्ध करुन देणे.
६. शासन निर्णय दिनांक ४ / ११ / २०२४ नुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्यांचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडिया सीएमपी (Cash Management Project) ई-कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत योग्य ती कार्यवाही शालार्थ प्रणालीत करण्यात यावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .