पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरतीबाबत.

  पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरतीबाबत.


शिक्षण आयुक्तांनी दि २८ जानेवारी २०२४ रोजी दिलेल्या नवीन सुचने नुसार 

राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी संदर्भाधिन पत्रान्वये शासनाने शासन निर्णय दिनांक १९/०६/२०१३ मधील तरतुदी विचारात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणी प्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करुन देण्याबाबत कळविले आहे. यानुसार पवित्र पोर्टलवर सेमी इंग्रजी शाळांकरीता नोंदविण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी - २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्यामधून शिफारस करण्यात येणार आहे. तथापि, अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,म.रा.पुणे यांच्या अधिनस्त प्रादेशिक विद्या प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंध संस्थेकडून घेण्यात येणार आहे. सदर कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षण सेवकांचे कौशल्य / ज्ञान असमाधानकारक असल्याचे आढळल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येईल अशी अट नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करावी.

२. स्थानिक स्वराज्य संस्थातील इंग्रजी माध्यमाचे प्रचलित शासन धोरणानुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२३ / प्रक्र ५०९ / टीएनटी-१ दिनांक १३/१०/२०२३ मधील निर्देशास अनुसरून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात येत आहे. समितीकडून शिफारशी प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

३. यास्तव सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये शासन निर्णय दिनांक १९/०६/२०१३ नुसार सेमी इंग्रजीसाठी व शासन निर्णय दिनांक १३ / १० / २०२३ मधील तरतुदीनुसार साधन व्यक्तीसाठी अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास, साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करुन केवळ सेमी इंग्रजीसाठी

शिक्षक पदांची मागणी नोंद करावी. सध्या केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या साधन व्यक्तींच्या जागा तूर्त राखून ठेवण्यात याव्यात.

शासन पत्रातील निर्देशानुसार दिनांक ३०/०१/२०२४ अखेर पर्यंत पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक कार्यवाही पूर्ण करावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.

download click Here


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.