दि. २९/०१/२०२४ रोजी आयोजित परीक्षा पे चर्चा २०२४' या कार्यक्रमास राज्यातील सर्व शाळांमधून प्रसिद्धी देणेबाबत
शिक्षण संचानालयाने दि १८ जानेवारी २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार
उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, केंद्र शासनामार्फत परीक्षा पे चर्चा २०२४' हा कार्यक्रम दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत मा. पंतप्रधान महोदय, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेशी 'परीक्षा पे चर्चा २०२४' च्या आणखी एका नवीन रोमांचक आवृत्तीमध्ये दिनांक २९ जानेवारी २०१४ रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे सकाळी ११.०० वाजता संवाद साधणार आहेत.
तरी त्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रात सदर योजनेबद्दल पुरेशी प्रसिद्धी मिळणेकरीता
https://drive.google.com/drive/folders/liCoDDBbijPVJIVM2X3jH5OvAQk16606?usp=sharing
या link वर उपलब्ध करून देण्यात आलेले बॅनर प्रत्येक शाळेतील दर्शनीय ठिकाणी लावावीत. तसेच सदर योजनेकरिता लागणारा खर्च समग्र शिक्षा अभियान योजनेमधील योग्य त्या लेखाशिर्षा अंतर्गत भागविण्यात यावा.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .