राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविणेबाबत.

 राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविणेबाबत.




मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा माहिती भरण्यासाठी, लिंक साठी येथे click करा.


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा माहिती भरण्यासाठी, आवश्यक असणारे फोटो यादी साठी येथे click करा.


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टाईप करावयाची माहिती Word / Text फाईल साठी येथे click करा.


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा काल दर्शिका download करण्यासाठी येथे click करा.


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा मार्गदर्शिका manual साठी येथे click करा.



राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्याचे प्रस्तावित आहे.

शासन निर्णय:-

१. अभियानाची व्याप्ती-:

i) राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात

iii)सहभागी होणे अपेक्षित आहे.

या अभियानासाठी शाळांची विभागणी अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य

संस्थांच्या शाळा व ब ) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.

सदर अभियान अ) बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र ब) वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच क) उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर खालीलप्रमाणे राबविण्यात येईल.




२. अभियानाची उद्दिष्टे :-

i) विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन

यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे.

ii) शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे.

(iii) क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे; राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे.

iv) राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे.

(v) विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्व पटवून देणे.

vi) विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण. vii)शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे.

३. अभियानाचा कालावधी:-

सदर अभियानाची सुरुवात औपचारिक कार्यक्रमाद्वारे होईल. त्यानंतर आयुक्त (शिक्षण) हे ज्या दिनांकास निश्चित करतील त्या दिनांकापासून पुढील ४५ दिवसांच्या कालावधीकरिता हे अभियान चालू राहील. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन या ४५ दिवसात करणे आवश्यक राहील.

४. अभियानाचे स्वरूप:-

४.१ अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल.

अ) विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग - एकूण ६० गुण ब) शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग-एकूण ४० गुण


गुणांकन






संबंधित गट विकास अधिकारी त्या तालुक्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे मुल्यांकन करण्यासाठी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांचा वरील प्रमाणे गट निश्चित करतील. असा गट निश्चित करताना केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यक्षेत्रात त्यांना मुल्यांकन करता येणार नाही. थोडक्यात गट विकास अधिकाऱ्यांना केंद्र प्रमुखांना व मुख्याध्यापकांना त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रांसाठी मुल्यांकनाची जबाबदारी द्यावी लागेल.

केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांचा गट त्यांना वाटप करण्यात आलेल्या क्षेत्रातील सर्वं व्यवस्थापनांच्या शाळांना भेटी देऊन मूल्यांकनाचे कार्य करतील.

• प्रत्येक केंद्रातून स्थानिक स्वराज्य संस्था व इतर व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीतून प्रत्येकी एक शाळा स्वतंत्रपणे या गटाने निवडावयाची आहे.

• केंद्र स्तरावर निवड झालेल्या शाळांमधून तालुका स्तरावरील दोन्ही वर्गवारीतून स्वतंत्रपणे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची शाळा निवडण्यासाठी मुल्यांकन समिती असेल.

पारितोषिके



अधिक माहिती साठी खालील शासन निर्णय सविस्तर वाचा.

download



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.