अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन इयत्ता ६ ते ८ च्या तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत..
SCERT च्या शिक्षण संचालकानी दि 9 जानेवारी २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचना दिल्या आहेत कि
उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्र. १ व २ नुसार समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्प सन २०२३-२४ अंतर्गत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील इयत्ता १ ते ८ च्या सर्व शिक्षकांना द्यायचे आहें. त्यानुषंगाने विभागस्तर प्रशिक्षण दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२३ या कालावधीत पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण ०५ दिवस होता त्यामध्ये ४ दिवस अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व १ दिवस सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी विभागीय डायट प्राचार्य यांची होती.
उपरोक्तनुसार इयत्ता ६ वी ते ८ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असून आयोजनाची जबाबदारी संबंधित डायट प्राचार्य यांची राहील. सदर प्रशिक्षणाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.
१. पहिला टप्पा दि. १६ ते २० जानेवारी २०२४
२. दुसरा टप्पा दि. ३० जानेवारी २०२४ ते ०३ फेब्रुवारी २०२४
सदर तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रती व्यक्ती (प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ ) प्रती दिन रक्कम रु. १५०/- प्रमाणे निधीच्या मर्यादेत खर्च करावा.
खर्चाच्या बाबी व निकष खालील प्रमाणे
१. मानधन - रु. ४०० प्रती दिन (फक्त तज्ज्ञ मार्गदर्शकांसाठी)
२. प्रशिक्षण वर्ग / Hall
३. इंटरनेट सुविधा
४. भोजन व्यवस्था (Working Lunch)
५. स्टेशनरी व किरकोळ खर्च
६. तज्ज्ञ मार्गदर्शक TA एकदा (एकदा जाणे व येणे)
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .