मराठा सर्वेक्षणास दि. २.२.२०२४ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

 मराठा सर्वेक्षणास दि. २.२.२०२४ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.



महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने दि 30 जानेवारी २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार 

महाराष्ट्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण दि.३१.१.२०२४ पर्यंत पूर्ण करण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले होते. तथापि काही ठिकाणी हे सर्वेक्षण ३१.१.२०२४ पर्यत पूर्ण होऊ शकत नसल्याने सर्वेक्षणास मुदतवाढ देण्याची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे निदर्शनास आले आहे. यास्तव सर्वेक्षणास दिनांक २.२.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी आपल्या जिल्हा/ महानगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षणाचे काम दि.२.२.२०२४ पर्यंत १००% पूर्ण करावे व दि.३.२.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत आपल्या क्षेत्रातील सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगास पाठविण्यात यावे ही विनंती.

अधिक माहिती साठी आयोगाचे पत्र पहा



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.