प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाज वेळेबाबत... MDM

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाज वेळेबाबत...

स्वयंपाकी तथा मदतनीस करारनामा नवीन नमुना download करण्यासाठी येथे click करा.

शिक्षण संचालकांनी दि 8 जानेवारी २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि..... 

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील इ १ ली ते ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याकरीता स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात येत असते. स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत शासनाने दि. १८ डिसेंबर, २०२३ रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्याना वितरीत करण्याचे व त्याअनुषंगीक सर्व कामकाज संपल्यानंतरही शाळेमध्ये विनाकारण स्वयंपाकी तथा मदतनीस यांना थांबविण्यात येत असलेबाबत तक्रार स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे विविध संघटनांनी संचालनालय तसेच शासनाकडे केलेल्या आहेत. प्रस्तुत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने व शासनाने त्यासंदर्भात निर्गमित केलेल्या संदर्भिय परिपत्रकान्वये सर्व जिल्ह्यांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे दैनंदिन कामकाजाची मर्यादा ४ तास करण्यात येत आहे. सदर चार तासामध्ये स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी त्यांना दि. १८ डिसेंबर, २०२३ रोजी सुधारित शासन निर्णयनुसार विहित करुन देण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. तद्नंतर त्यांचे कामकाज संपल्यानंतर त्यांना विनाकारण शाळेमध्ये थांबवून ठेवण्यात येवू नये.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.