जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली कार्य मुक्ती बाबत

  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली कार्य मुक्ती बाबत


ग्रामविकास विभागाने दि 4 जानेवारी २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार.......

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे करण्याबाबत सुधारित धोरण संदर्भाधीन दि. २३/०५/२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. त्यानुसार आंतरजिल्हा बदल्याची प्रक्रीया Vinsys IT Services (I) Pvt. Ltd, या संस्थेकडून पुर्ण करण्यात आलेली असुन बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येऊन संबधित जिल्हा परिषदाकडे पाठविण्यात आल्या आहेत.

बदली प्रक्रीया राबविताना विद्यार्थ्यांचे शैक्षणीक हित महत्वाचे असुन त्यात खंड पडू नये यास्तव शालेय शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी घ्यावा.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा




Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .