खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, कटक मंडळे अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या थकीत देयके, ७ वा वेतन आयोग हप्ता व इतर देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करणे बाबत

 खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, कटक मंडळे अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या थकीत देयके, ७ वा वेतन आयोग हप्ता व इतर देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करणे बाबत


उपरोक्त विषयान्वये शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

१. थकीत देयके-खाजगी शाळांच्याबाबत संचालनालय स्तरावरुन ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षात थकीत देयके ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार आवक जेष्ठतेनुसार देयके अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

२. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा २, ३, व ४था हप्ता व इतर थकीत देयके शालार्थ प्रणाली द्वारे ऑनलाईन मधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लेखाशिर्ष २२०२०५५८,२२०२०५३१, २२०२०५४९, २२०२०५७६ मध्ये सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१, २, ३, राहिला असल्यास ) चौथा हप्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावा.

३. लेखाशिर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, मध्ये सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोग सातव्या वेतन आयोगाचा (१, २, ३, राहिला असल्यास ) चौथा हप्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावा.

४. लेखाशिर्ष २२०२३३६१ मध्ये सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१,२, राहिला असल्यास ) ३ रा हप्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावा.

५. उर्वरीत लेखाशिर्ष बाबत स्वतंत्र पत्र / सूचना देण्यात येतील.

६. अंशतः अनुदानित शाळेतील २० टक्के, ४० टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा याच आर्थिक वर्षामध्ये सदर टप्पा वाढ झाली व यावाढीव टप्याचा फरक अदा करण्याचे बाकी असल्यास अदा देय फरक ऑनलाईन मधून अदा करताना प्रलंबित थकीत देयके प्रमाणे गृहीत धरुन हा फरक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार देयके अदा करण्यात यावी.

७. सन २०२३-२४ याच आर्थिक वर्षातील थकीत देयके प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे काढण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे. देयके ऑनलाईन काढण्याची कार्यवाही करावी.

८. शासन निर्णय दिनांक ४/०१/२०२४ नुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडिया सीएमपी (Cash Management Product) ई-कुबेर (E- Kuber) प्रणालीमार्फत थेट कर्मचा-यांच्या बँक खात्यात करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

९. सन २०२३-२४ वित्तीय वर्षातील माहे मार्च २०२३ पासूनची थकबाकी या वित्तीय वर्षामध्ये आहरित करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार देयके अदा करावी.

१०. थकीत प्रशासकीय मान्यतेची लोकायुक्त प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे प्रथम प्राधान्याने काढण्याची कार्यवाही करावी.

उपरोक्त देयके अदा करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये Live करण्यात आलेली आहे. वरील नमूद मुद्यातील देयके ऑनलाईन सादर करून पारीत करण्याची तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी. दिलेल्या अनुदानाचा पुर्ण विनियोग दि. ०७/०२/२४ पर्यतं करून अहवाल संचालनालयास सादर करावा.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.

download

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.