जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या आजी/माजी सैनिकांच्या पत्नीच्या आंतर जिल्हा बदलीबाबत.
ग्रामविकास विभागाच्या दि २५ जानेवारी २०२४ च्या परिपत्रकानुसार
उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधिन दि. १९.१०.२०२३ च्या शासन पत्रान्वये मागविण्यात आलेली माहिती शासनास अद्याप अप्राप्त आहे. सबब, आपल्या विभागाच्या माहिती अभावी प्रस्तुत प्रकरणावर कार्यवाही करण्यास विलंब होत आहे. तरी संदर्भाधिन शासनपत्रान्वये मागविण्यात आलेली माहिती कोणत्याही परिस्थितीत सात दिवसाच्या आत शासनास उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, सदरची माहिती विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यास आपल्या विभागाची माहिती निरंक समजण्यात येवून सदर प्रकरणावर कार्यवाही करण्यात येईल. तद्नंतर आपल्या अहवाला अभावी कोणतेही प्रकरण प्रलंबित राहिल्यास व तद्अनुषंगाने न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकारी / कर्मचारी हे राहतील व त्याची जबाबदारी त्यांच्यावर निश्चीत करण्यात येईल याची जाणीव करुन देवुन या प्रकरणा संबधीचा अहवाल विहीत कालावधीत उलटटपाली सादर करण्याचे आदेश देण्यात यावेत, ही विनंती.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .