माहे डिसेंबर, २०२३ चे वेतन देयके ७ वा वेतन आयोग ३ रा हप्ता (राहीलेला १ ला २ रा ) हप्त्यासह पारीत करणे.

 माहे डिसेंबर, २०२३ चे वेतन देयके ७ वा वेतन आयोग ३ रा हप्ता (राहीलेला १ ला २ रा ) हप्त्यासह पारीत करणे.



शिक्षण संचालक श्री शरद गोसावी यांनी दि २१ डिसेंबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार....

उपरोक्त विषयान्वे संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णयान्वये बिम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून माहे डिसेंबर, २०२३ च्या वेतनासोबत ७ व्या वेतन आयोगाचे १,२,३ हप्ते व वैद्यकीय देयके अदा करावयाचे आहेत. वैद्यकीय देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करणेसाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.वैद्यकीय देयके अदा करताना ती आवक नोंद रजिस्टर मधील आवक ज्येष्ठतेने (प्रथम आवक प्रथम प्राधान्य) अशा ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावी.

क्षेत्रिय स्तरावर तांत्रिक कारणास्तव / शाळांनी देयके सादर न केल्याने सन २०२१-२२ मध्ये करावयाचा राहीलेला सातव्या वेतन आयोगाचा १ला व २ रा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे. ७ व्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करत असताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर, २०२३ च्या वेतनासोबत अदा करणे आवश्यक आहे.

सबब अनुदानाची उपलब्धता ते खर्च होण्यासाठी कालमर्यादा विचारात घेता लेखाशिर्ष २२०२०९७३ / ३६ (जिल्हा परिषद शाळा), २२०२०२०८ / ३६ (खाजगी प्राथमिक शाळा व मनपा/नपा/नप/कटक मंडळे शाळा ) या लेखाशिर्षामध्ये माहे डिसेंबर, २०२३ चे वेतन व सातव्या वेतन आयोगाचा राहीलेला १,२ व तसेच नियमित देय असलेला ३ रा हप्ता अदा करणेबाबत यथा नियम कार्यवाही करण्यात येईल.

उर्वरीत लेखाशिर्षाबाबत स्वतंत्र आदेश देण्यात येतील. भविष्यात वैद्यकीय देयकाबाबत तसेच ७ वा वेतन आयोगाचा पहिला दुसरा व तिसरा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबधित विभागीय शिक्षण उपसंचालक,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व अधिक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक) यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात कृपया याची नोंद घ्यावी.उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार पुर्णपणे खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी .

HTML

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.

download click here


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.