माहे डिसेंबर २०२३ चे वेतन देयके ७ वा वेतन आयोग ३ रा हप्ता( राहिलेला १ला व २ रा ) हप्त्यासह पारित करणे बाबत.
शिक्षण संचालक यांनी दि. 20 डिसेंबर 2023 रोजी निर्गमिट केलेल्या परिपत्रक नुसार
१. उपरोक्त विषयान्वये दि. १९ / १२ / २०२३ रोजी बिम्स प्रणलीवर उपलब्ध असलेलया अनुदानातून माहे डिसेंबर च्या वेतनासोबत ७ वा वेतन आयोग १, २, ३ हप्ता अदा होवून वैद्यकीय देयके अदा करणे शक्य आहे.
२. वैद्यकीय देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करणेसाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.
३. वैद्यकीय देयके अदा करतांना ती आवक नोंद रजिस्टर मधिल आवक जेष्ठतेने (प्रथम आवक प्रथम प्राधान्य) ऑन लाईन पध्दतीने अदा करण्यात यावी
४. क्षेत्रिय स्तरावर तांत्रिक कारणास्तव / शाळांनी देयेके सादर न केल्याने अदासन २०२२-२३ मध्ये करावयाचा राहिलेला सातवा वेतन आयोगाचा १ला व २ रा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे.
७ वा वेतन आयोग हप्ता अदा करतांना तो वेतन देयका सोबतच अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर २०२३ च्या वेतनासोबत अदा करणे सर्व बाजूने संयूक्तीक ठरणार आहे.
६. सबब अनुदानाची उपलब्धता ते खर्च होण्यासाठी असणारी कालमर्यादा विचारात घेता
लेखाशिर्ष २२०२०४४२, २२०२०४७८,२२०२०४६९, २२०२०५५८, २२०२०५७६ २२०२०५३१, २२०२०५४९ या लेखाशिषां मध्ये माह डिसेंबर २०२३ चे वेतन, सातवा वेतन आयोगाचा राहिलेला १ ला व २ रा हप्ता तसेच नियमित देय असलेला तिसरा हप्त्यासह अदा करणे बाबत यथा नियम कार्यवाही करण्यात यावी.
७. उर्वरीत लेखाशिर्ष बाबत स्वतंत्र आदेश देण्यात येतील.
भविष्यात वैद्यकीय देयका बाबत तसेच ७ वा वेतन आयोग पहिला दूसरा व तिसरा हप्त्या बाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार पुर्णपणे खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .