जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत
ग्रामविकास विभागाने दि १८ डिसेंबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रका नुसार
उपरोक्त विषयाबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विन्सीस कंपनी यांच्यासमवेत आज दि.१८/१२/२०२३ रोजी व्हिडीओ कॉन्फरसिंग (V. C. ) व्दारे बैठक घेण्यात आली. सदर बैठकीच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक (गट-क) संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीबाबत कळविण्यात येते की,
अ. जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये संवर्ग-१ व संवर्ग-२ या संवर्गात अर्ज सादर कलेल्या सर्व शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण अधिकारी यांच्याकडून करुन घ्यावी. अशी पडताळणी करतांना नैसर्गिक न्याय म्हणून संबंधित शिक्षकांना म्हणने मांडण्याची वाजवी संधी देण्यात यावी. सदर पडताळणीचे काम दि.१८, १९ डिसेंबर, २०२३ दोन दिवसात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे.
ब. प्रथमतः सन २०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधिन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. तद्नंतर नव्याने संधी दिलेल्या दि.३०/०६/२०२३ पर्यंत बदलीस पात्र ठरललेल्या उर्वरित प्राथमिक शिक्षकांची बदलीप्रक्रीया विन्सीस कंपनीने सुरु करावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .