शिक्षक पदभरती - २०२२ शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात देण्याची कार्यवाही करण्याबाबत.

 शिक्षक पदभरती - २०२२, शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात देण्याची कार्यवाही करण्याबाबत



शिक्षण आयुक्त श्री सुरज मांढरे यांनी दि १५ डिसेंबर २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि..

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की, राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी - २०२२ चे आयोजन दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ या कालावधीमध्ये करण्यात आलेले होते. सदर परिक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करुन घेण्यात आलेले आहेत.

दरम्यानच्या कालावधीमध्ये सन २०२२-२३ च्या आधार आधारित संच मान्यता व सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक ०६/०७/२०२१ अन्वये बिंदूनामावली प्रमाणित करण्याची आवश्यकता विचारात घेवून सर्व जिल्हा परिषदांची बिंदूनामावली तपासून घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

शिक्षक पदभरतीसाठी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका क्रमांक ०२ / २०२२ दाखल आहे. शाळांना शिक्षक वेळेत शिक्षक उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही तातडीने करणे आवश्यक आहे. सध्या सेवेतील शिक्षकांसाठी आंतर जिल्हा बदलीचा ६ वा टप्प्याची कार्यवाही सूरु आहे. सदरच्या कार्यवाहीसाठी सध्या रिक्त असलेली पदे विचारात घेण्यात येत असल्याने शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीसाठी रिक्त आरक्षणाची नोंद करता येत नाही. तथापि, सदरच्या रिक्त जागांची निश्चिती तात्काळ पूर्ण करुन जाहिरातीसाठी रिक्त आरक्षणाच्या पदांची माहिती उपलब्ध करुन घ्यावी.

अनुसूचित जमाती या प्रवर्गाच्या पेसा क्षेत्रातील रिक्त पदांच्या बाबतीत आपल्यास्तरावरुन पदभरतीची कार्यवाही ऑफलाईन पध्दतीने करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र क्र. ५१६४ दिनांक २२/०८/२०२३ अन्वये कळविण्यात आले आहे. तथापि, या प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेतील वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.

राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करुन जाहिरात देण्याची सुविधा दिनांक १६ / १० / २०२३ पासून देण्यात आलेली आहे. त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी म्हणून पोर्टलवरील सूचना व वेळोवेळीचे शासन निर्णय विचारात घेवून रिक्त असलेले आरक्षण व जिल्हयातील विषयनिहाय रिक्त पदे नमूद करुन जाहिरात देण्याची कार्यवाही करावी.

शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दिनांक ०७/०२/२०१९ मधील तरतूदीनुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी रिक्त पदांचे सामाजिक आरक्षण, अध्यापनाचे गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती पोर्टल नोंद करण्याची सुविधा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉगीनवर देण्यात आलेली आहे. त्यांनतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी नोंद केलेली माहिती आपण पडताळणी करुन योग्य असल्यास रोष्टर व विषयनिहाय रिक्त पदासाठी आपल्या लॉगीनवर मान्य (Approve ) करावयाची आहे. त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉगीनवर (Generate Advertisement) यावर क्लिक केल्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेकडील शिक्षक रिक्त पदांची जाहिरात जनरेट होणार आहे.

सदरची कार्यवाही करण्यासाठी आवश्यक असणारी आरक्षणनिहाय रिक्त पदे तसेच गट, विषयनिहाय रिक्त पदांची माहिती पडताळणी करुन जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षक पदभरती विनाविलंब होण्यासाठी पवित्र पोर्टलवरील सूचनानुसार तात्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी व केलेली कार्यवाही या कार्यालयास अवगत करावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा

for download click here


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.