प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत.....
i. शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विहीत वेळेत पोषण आहार शिजविण्याचे काम करणे.
ii. तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे.
iii. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर आहाराचे वाटप करणे.
iv. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर जेवणाच्या जागेसह स्वयंपाकगृहाची साफसफाई करणे तसेच सांडलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे.
V.पोषण आहाराकरीता वापरण्यात आलेल्या भांड्याची तसेच विद्यार्थ्यांच्या ताटांची साफसफाई / स्वच्छता करणे.
vi. पोषण आहाराकरीता आवश्यक असणारे पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरविणे.
vii.शाळास्तरावर परसबाग निर्मिती व देखभालीकरीता सहकार्य करणे.
viii.अन्न शिजविताना वापरलेल्या भाजीपाला विषयक नोंदी ठेवणे.
प्रस्तुत योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी. तदनंतर याबाबत संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुढील उचित कार्यवाही करण्यात यावी.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .