उच्च प्राथमिक (इ. ५वी) व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत.

 उच्च प्राथमिक (इ. ५वी) व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत.


शिक्षण संचालक (योजना) श्री. महेश पालकर यांनी दि 12 डिसेंबर २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि.......

उपरोक्त संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे. संदर्भीय पत्र क्र. १ अन्वये विद्यार्थ्यांची यादी सोबत जोडून पाठविण्यात आली आहे. या पत्रासोबत जिल्हानिहाय स्वतंत्र यादी सोबत जोडून पुनःश्च पाठविण्यात येत आहे.

उपरोक्त विषयाबाबत उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती (इ. ५ वी व इ. ८ वी) मधील शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसलेबाबतच्या तक्रार मोठया प्रमाणात या संचालनालयास प्राप्त होत आहे. अशा तक्रारींचे अवलोकन केले असता संबंधित विद्यार्थ्यांचा बँक खाते क्रमांक किंवा IFSC CODE चुकीचे असल्याने त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त झालेली नाही. तरी अशा विद्यार्थ्यांची माहिती या संचालनालयाच्या www.eduonlinescholarship.com या संकेतस्थळावर अचूक भरणेबाबत कळविण्यात आलेले आहे. परंतु अद्याप पर्यंत सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आलेली नाही.

२/- सन २०१७ ते सन २०२१ या कालावधीतील काही शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे खाते क्रमांक किंवा IFSC CODE याबाबतची माहिती अचूक भरणेसाठी अशा विद्यार्थ्यांची यादी संबंधित शिक्षणाधिकारी (योजना) व गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिनवर तसेच शिक्षणाधिकारी यांचे ई-मेलवर आपणांस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. Error Pending यादीतील विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांकामध्ये चूक असल्यामुळे ते शिष्यवृत्ती पासून वंचित आहे. तरी अशा विद्यार्थ्यांचे अचूक बँक खाते क्रमांक, IFSC CODE विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर भरल्यास सदर विद्यार्थ्यांच्या बँक खातेक्रमांकावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करणे शक्य होईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे खाते बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये आहे त्या बँकेचा IFSC CODE ची नोंद ऑनलाईन माहिती भरताना मुख्यतः करण्यात यावी. परंतू सदरचे कामकाज संथगतीने चालू असल्यामुळे मोठया प्रमाणात प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना) यांनी सदरच्या कामकाजाचा आढावा घेऊन सदरचे कामकाज दिनांक २२.१२.२०२३ पर्यंत विहित मुदतीत पूर्ण करणेबाबत गटशिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात याव्या.

३/- याबाबत शासनस्तरावरुन विचारणा होत असून विधीमंडळात लक्षवेधी सूचना व तारांकित व अतारांकित प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची अचूक माहिती दिलेल्या विहित मुदतीत भरण्यात यावी. दिलेल्या मुदतीत माहिती न भरल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल याबाबतची नोंद घेण्यात यावी. (सोबत विद्यार्थ्यांची यादी सन २०१७- २०२१)

४/- सन २०२२ व २०२३ मध्ये शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक, IFSC CODE याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या कार्यालयाच्या संकेतस्थळावर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या लॉगीन मधून भरणेबाबत आपल्यास्तरावरुन सूचना देण्यात याव्यात.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक सविस्तर वाचा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.