जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत
परिपत्रक दि ११ डिसेंबर २०२३
दि 1 डिसेंबर २०२३ रोजी ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार.....
उपरोक्त संदर्भाधीन दि.३०/११/२०२३ व दि.०१/१२/२०२३ च्या शासनपत्रान्वये आंतरजिल्हा बदलीसाठी बदलीस पात्र शिक्षकांना अर्ज सादर करण्याची देण्यात आलेली मुदत आता दि.१२/१२/२०२३ ते दि.१५/१२/२०२३ अशी करण्यात आलेली आहे. तरी संदर्भाधीन संदर्भ क्र. (४) येथील दि.३०/११/२०२३ चे पत्र दि.०१/१२/२०२३ शुध्दिपत्रकातील निदेशानुसार कार्यवाही सुरु करण्यात यावी. याकरीता https://ott.mahardd.com हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आलेले असून वरीलप्रमाणे सूचना सर्वसंबंधितांना निदर्शनास आणून देण्याची व त्यानुषंगाने पुढील कार्यवाही करण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .