Attendance Bot बाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या समस्यांची
उत्तरे
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई (MPSP, Mumbai)
अंतर्गत
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे
- समस्या १- Invalid U-DISE कोड
शाळेतील रेकॉर्डस, शाला मान्यता प्रपत्र व UDISE प्रपत्र यावर UDISE कोडची पडताळणी करावी.
तालुका समग्र शिक्षा डेटा ऑपरेटरशी संपर्क करुन UDISE कोड ची पडताळणी करावी.
- समस्या २- Invalid मोबाईल क्रमांक
सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर मुख्याध्यापक / DDO-1 यांनी शालार्थ पोर्टलवर अपडेट करावा व गटशिक्षण अधिकारी / DDO-2 यांनी approval दिल्यानंतर किमान ८ दिवस प्रतीक्षा करा.
हाच मोबाईल नंबर UDISE पोर्टल व सरल प्रणाली वर सुद्धा नोंदविण्यात यावा.
- समस्या 3- Invalid शालार्थ / शिक्षक आय. डी.
मुख्याध्यापक / DDO-1 यांच्याकडून शालार्थ पोर्टलवरून शिक्षक आय. डी. प्राप्त करून घ्यावा. तसेच, शालार्थ आय. डी. व UDISE कोड विसंगत असल्यास अपडेट करावा.
- समस्या ४- उपस्थिती चिन्हांकित होत नाही.
आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची नावे सरल व UDISE पोर्टल वर अद्ययावत करावी. त्यानंतर यादी उपलब्ध होईल.
- समस्या ५ -पूर्वीच्या शिक्षकांची नावे दिसत आहे.
वेतन प्रणाली, शालार्थ पोर्टल व UDISE वर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अद्ययावत करावी. अन्यथा जुन्या शाळेच्या पोर्टल वर नावे दिसत राहतील. सेवानिवृत्त शिक्षकांची नावे वेतन प्रणाली मधून DELETE करावी.
- समस्या ६ -मदरसा मध्ये जाणारे विद्यार्थी
शालार्थ वेतन प्रणालीतून वेतन मिळत असल्यास सदर मदराश्यातील विद्यार्थ्यांच भरता येते.
- समस्या ७- मागील वर्गातील विद्यार्थ्यांची नावे दिसत आहे.
विद्यार्थ्यांचे सरल पोर्टल वर पुढील वर्गात प्रमोशन करावे व यादी अपडेट करावी.
- समस्या ८- शिक्षण हमी कार्ड दिलेले विद्यार्थी
सदर विद्यार्थ्यांची सरल पोर्टल वर New Tab घेऊन इयत्तनिहाय नोंद करावी. New Tab करता तालुका समग्र शिक्षा ऑपरेटरशी संपर्क करावा.
- समस्या ९ -सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत
वेतन प्रणाली / शालार्थ पोर्टल व UDISE वर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अद्ययावत करावी.
- समस्या १०- सर्व विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट नाहीत
आपल्या वर्गातील मुलांची नावे सरल व UDISE पोर्टल वर अद्ययावत करावी. त्यानंतर यादी उपलब्ध होईल.
- समस्या ११ -शून्य शिक्षक असलेली शाळा
सध्या माहिती भरू नये. अधिकृत शिक्षक नेमणुकीनंतर माहिती भरावी.
विद्यार्थी नाव/यादीच दिसत नाही
उत्तर द्याहटवास्थानिक सुटी असल्यास काय करावे उदा.यात्रा,उरुस इ.
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .