सन २०२३ - २४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती नोंदविणेबाबत. शाळांनी माहिती अद्ययावत न केल्यास सदर शाळांमधील शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येवू नये बाबत

  सन २०२३ - २४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती नोंदविणेबाबत. शाळांनी माहिती अद्ययावत न केल्यास सदर शाळांमधील शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येवू नयेबाबत


MPSP ने दि २३ नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये राज्यातील मान्यता प्राप्त सर्व शाळांची माहिती दि. ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी पर्यंत भरून अंतिम करण्याकरिता कळविण्यात आले आहे परंतू दि. २२ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार ८८.०८% शाळांची भौतिक माहिती अद्ययावत केलेली आहे, ७६.२७% शाळांमधील शिक्षकांची माहिती अंतिम केलेली आहे, ७१.७०% विद्यार्थ्यांची माहिती अंतिम केलेली आहे. २५,७८८ शाळांनी शिक्षकांची अद्यापपर्यंत माहीती भरण्याकरिता सुरुवातही केली नाही, तर १२,९४७ शाळांनी भौतिक माहिती भरणेकरिता चालढकल करित असल्याकारणाने माहिती पूर्ण न झाल्यामुळे राज्य व केंद्र शासनास सन २०२४-२५ व सन २०२५-२६ समग्र शिक्षा, स्टार्स व PM Shri योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक सादर करण्यासाठी विलंब होत आहे. याबाबत आपणास कळविण्यात येते की, जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित शाळांना दि. ३० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती अंतिम करण्याकरिता कळविण्यात यावे. शाळांनी माहिती अद्ययावत न केल्यास सदर शाळांमधील शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येवू नये. जिल्हा व तालुका स्तरावरून वेतन पथकांनी सदर शाळांकडून यु- डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची सर्व माहिती अद्ययावत केल्याचे मुख्याध्यापक यांचेकडून प्रमाणित करून घ्यावे, त्यानंतरच वेतन अदा करण्यासाठी आदेशित करावे. माहिती अद्ययावत न झाल्यास सदर शाळेमधील विद्यार्थी शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभापासून (उदा. मोफत गणवेश, पाठयपुस्तके, शैक्षणिक सोयी-सुविधा, स्कॉलरशिप इ.) वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माहिती भरतांना तांत्रिक अडचण येत असल्यास तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील टेक्नोसेव्ही शिक्षक, एम. आय. एस. कोऑर्डीनेटर व संगणक प्रोग्रामर यांचेशी संपर्क करण्यात यावा.

अधिक माहितीचा साठी खालील परिपत्रक पहा.

for download click here


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.