संकलित मूल्यमापन १ साठी कमी पडणाऱ्या प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स केलेल्या देयकाच्या नस्तीची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रत कार्यालयास तात्काळ सादर करणेबाबत.....

 संकलित मूल्यमापन १ साठी कमी पडणाऱ्या प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स केलेल्या देयकाच्या नस्तीची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रत कार्यालयास तात्काळ सादर करणेबाबत.....


वरील विषयान्वये STARS प्रकाल्पामधील SIG २ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन करण्यात येत आहे.

उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार राज्यात दि. ३० व ३१ ऑक्टोंबर व ०१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित शाळामध्ये प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन १ आयोजन करण्यात आलेले होते.

संदर्भ क्र. २ नुसार दिनांक २७ ऑक्टोंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये राज्यस्तरावरून पुरवठा याबाबत आढावा घेण्यात आलेला होता. यामध्ये साहित्य प्राप्त झालेल्या जिल्ह्यामध्ये साहित्य काहीप्रमाणात कमी पडत असल्याचे सांगण्यात आलेले होते. विद्यार्थी चाचणीपासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील कमी पडणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन त्यांचे स्तरावर झेरॉक्स काढून शाळांना पुरवठा करणेबाबत कळविले होते. तसेच कमी पडणाऱ्या प्रश्नपत्रिकांची संख्या परिषदेला दिनांक ३० ऑक्टोंबर २०२३ अखेर काळविणेबाबत सूचित केलेले होते. परिषदेला प्राप्त मागणीनुसार जिल्ह्याला खर्च अदा करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार अहमदनगर, पुणे, बीड, भंडारा, धुळे, गोंदिया, पालघर, वाशीम या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांनी परिषदेकडे मागणी केलेली आहे. तरी मागणी केलेल्या जिल्ह्यांनी सदर चाचणी साहित्याचा शाळांना पुरवठा केलेल्या देयकाच्या नस्तीची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रत या कार्यालयास दि. ९ नोव्हेंबर २०२३ अखेर सादर करावी. जेणेकरून आपले देयक आपणास वेळेत देण्याची आवश्यक कार्यवाही तात्काळ करता येईल.

नस्तीमध्ये सादर करावयाची माहिती.

१. प्रश्नपत्रिका झेरॉक्स काढल्या की राज्यावरून पुन्हा छपाई करून घेतल्या?

२. परिषदेकडे विहीत कालावधीत प्रश्नपत्रिकांची मागणी केलेल्या मेलची साक्षांकित प्रत. ३. बिलाच्या/देयकाच्या साक्षांकित केलेल्या प्रती (पेड & कॅन्सल शिक्का - स्वाक्षरीसह) ४. देयकाचा एकत्रित घोषवारा व एकूण देयक

५. नियमानुसार कोटेशन (दरपत्रक) ची आवश्यकता असल्यास त्याचे पुरावे.

६. ज्या खात्यावर निधी वर्ग करावयाचा आहे त्या खात्याचा बँक तपशील (PFMS खाते सोडून)

७. प्रश्नपत्रिका सांखिकी माहिती तक्ता सोबत जोलेला आहे त्याप्रमाणे नस्तीमध्ये जोडणे.

तरी याबाबत आवश्यक नस्ती परिषदेला प्रत्यक्ष आपण स्वत: अथवा आपल्या प्रतिनिधीमार्फत दि. ०९ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ पर्यंत सादर करावी. माहिती अचूक व वेळेत प्राप्त होईल याबाबत दक्षता घ्यावी.


for download click Here


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.