संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणेबाबत...
PAT (महाराष्ट्र) चॅटबॉट मार्गदर्शिका download साठी येथे click करासंकलित मूल्यमापन १ चे गुण PAT महाराष्ट्र या ChatBoat वर भरणेबाबत SCERT चे
LIVE प्रशिक्षण खाली थेट पहा.
SCERT ने निर्गमित केलेल्या दि २४ नोव्हेंबर २०२३ च्या परिपत्रकानुसार.....
विद्यार्थ्यांचा अध्ययन संपादणूकीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती-योजना राबविण्यासाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात STARS प्रकल्प अंतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात येत आहे. यातील पहिली पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शाळास्तरावर घेण्यात आलेली आहे. दुसरी संकलित मूल्यमापन १ ही चाचणी ३१, ३१ ऑक्टोंबर व ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आली आहे.
तरी आपणास कळविण्यात येते की, संदर्भ ल १ नुसार विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन १ या चाचणीचे गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण कसे नोंदवावेत याबाबतचे ऑनलाईन स्वरुपात यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२ ते १ या कालावधीत देण्यात येणार आहे. तरी आपल्या अधिनस्त शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळा मधील शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण घेणेबाबत सूचित करण्यात यावे. प्रशिक्षण झालेनंतर सदर शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणेबाबत आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात.PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याचा कालावधी दि. २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ असणार आहे.
- PAT (महाराष्ट्र) चॅटबॉट मार्गदर्शिका https://bit.ly/PATManual या लिंकवर पाहता व download करता येईल.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.
Bhamare sunita rajaram
उत्तर द्याहटवाKhar
उत्तर द्याहटवाकोड बरोबर पाठवला तरी चुकीची आहे म्हटले जाते. तरी माहिती ऑनलाईन नोंद होत नाही
उत्तर द्याहटवाID-02DEDSSJM7305
उत्तर द्याहटवाShriram shesherao jadhawar.
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .