शिक्षक पदभरती - २०२२ शिक्षक पदभरतीसाठी बिंदूनामावली अद्ययावत करण्याबाबत.

शिक्षक पदभरती - २०२२

शिक्षक पदभरतीसाठी बिंदूनामावली अद्ययावत करण्याबाबत.



शिक्षण आयुक्तानी दि 29 नोव्हेंबर 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे की ..

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की, राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी- २०२२ चे आयोजन दिनांक २२/०२ / २०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ या कालावधीमध्ये करण्यात आलेले होते, सदर परिक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करुन घेण्यात आलेले आहेत.

तदनंतर आता राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या शाळांतील भरण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करुन जाहिरात देण्याची सुविधा दिनांक १६/ १० / २०२३ पासून देण्यात आलेली आहे. त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी म्हणून संबंधित शिक्षण संस्था आरक्षण विषयक बिंदूनामावली तपासणी करुन आवश्यक माहितीची नोंद पोर्टलवर करित आहेत.

तथापि, शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी शिक्षण संस्थाच्या बिंदूनामावली तपासणीची कार्यवाही अध्यापही पूर्ण झालेली नाही. यास्तव संदर्भाधिन शासन निर्णयातील तरतूदी विचारात घेवून पदभरतीसाठी बिंदूनामावली तपासणी करणे अनिवार्य आहे..

मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत नियोजन करुन बिंदूनामावली तपासण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. सदर प्रक्रियेसाठी लागलेला कालावधी व आलेल्या अडचणी लक्षात घेता शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांनी खालील सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी.

१. बिंदूनामावली तपासताना आलेल्या अडचणी लक्षात शासनस्तरावरुन आढावा बैठक घेवून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करुन खाजगी शिक्षण संस्थांची बिंदूनामावली तपासण्याची कार्यवाही करण्यात यावी.

२. खाजगी शिक्षण संस्थांची बिंदूनामावली तपासणी करण्यासाठी जिल्हयात नोंद असलेल्या शैक्षणिक संस्थांची सरल पोर्टलवरील यादी उपलब्ध करुन घ्यावी.

३. उक्त यादीतील खाजगी शिक्षण संस्थांच्या सद्यस्थितीत तपासलेल्या बिंदूनामावलीचा आढावा घेण्यात यावा.

४. ज्या शिक्षण संस्थांची बिंदूनामावली तपासलेली आहे परंतु ती संदर्भाधिन शासन निर्णयानुसार तपासली नसल्यास अशा सर्व खाजगी शिक्षण संस्थांची बिंदूनामावलीस अंतीम मान्यता मिळण्यासाठी प्राथमिक शाळांच्या बिंदूनामावलीची प्राथमिक तपासणी संबंधित शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) यांनी तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या बिंदूनामावलीची प्राथमिक तपासणी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी करणे आवश्यक आहे.

५. शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक व शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई यांनी बिंदूनामावली विहित मुदतीत पुर्ण होण्यासाठी व नियमित पाठपुरावा करण्यासाठी किमान वर्ग-२ दर्जाचा अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी व त्याचा तपशिल संचालनालयास तसेच शिक्षण आयुक्तलायास सादर करावा.

६. सदर समन्वय अधिकारी यांनी सहायक आयुक्त (मावक कक्ष), विभागीय आयुक्त कार्यालय यांचेशी संपर्क साधून बिंदूनामावलीमध्ये त्रुटी असल्यास संबंधित शिक्षण संस्थेसोबत पाठपुरावा करुन जिल्हयातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांची बिंदूनामावली तपासण्याची कार्यवाही पूर्ण करावी. ७. शिक्षक पदभरतीची कार्यवाही वेळेत पूर्ण होण्यासाठी सहायक आयुक्त (मावक), विभागीय आयुक्त कार्यालय यांना मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास जिल्हास्तरावरुन आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी. सहायक आयुक्त (मावक) यांनी बिंदूनामावली तपासून देण्याचे योग्य ते नियोजन करुन विहित मर्यादेत बिंदूनामावली अंतिम करुन देण्याची कार्यवाही करावी.

८. शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक व शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई यांनी आपल्या विभागाचे शिक्षण उपसंचालक यांना दररोज केलेल्या कार्यवाहीचा आढावा दयावा व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित शिक्षण संचालनालयास आढावा देण्यात यावा.

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठी आपल्या अधिनस्त सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदूनामावली प्रमाणित करण्याच्या आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात तसेच वेळेत बिंदूनामावली तपासणी पूर्ण होण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा

For download click Here

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.