अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण आयोजनाबाबत..Management of learning process and continuous comprehensive evaluation regarding training planning..

 अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण आयोजनाबाबत

SCERT ने दि ९ नोव्हेंबर २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचना दिल्या आहेत कि.....

उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्र. १ नुसार STARS प्रकल्प सन २०२३ - २४ अंतर्गत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील इयत्ता १ ते ८ च्या सर्व शिक्षकांना द्यायचे आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी ०५ दिवस असून अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे राज्यस्तर प्रशिक्षण पहिला टप्पा दिनांक २४ ते २७ सप्टेबर २०२३ व दुसरा टप्पा दिनांक १८ ते २२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पूर्ण झाले आहे.विभागस्तर प्रशिक्षण निवासी स्वरुपात दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी विभागीय डायट प्राचार्य यांची राहील. त्यांना प्रशिक्षण स्थळ निवड व आयोजन यासाठी विभागीय उपसंचालक यांनी सहकार्य करावयाचे आहे. सर्व जिल्हा डायट प्राचार्य यांनी प्रति BRC/URC अशा ०९ व्यक्तींची निवड करून यादी प्राचार्य विभागीय DIET यांना द्यावी.

या प्रशिक्षणासाठी सहभागी प्रशिक्षणार्थी हे प्रत्येक जिल्ह्यातील प्रती BRC / URC ०९ व्यक्ती असणार आहेत. सदर ०९ व्यक्तींची निवड करताना जि.प., म.न.पा./न.पा./न.प., आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळा, खाजगी अनुदानित या सर्वच शाळांचे शिक्षक/ मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील अधिव्याख्याता व विषय सहायक यांचा समावेश करावा.

विभागस्तर प्रशिक्षणानंतर तालुकास्तर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे एकूण ०५ दिवसांचे असेल. सदर प्रशिक्षणामध्ये शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा (जि.प. म.न.पा./न.पा./न.प.), आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांचा समावेश असेल. सदर प्रशिक्षण तीन टप्प्यात पूर्ण होईल. इयत्ता १ ली ते ५ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाच्या संभाव्य तारखा पुढीलप्रमाणे आहेत

१. पहिला टप्पा दि. ०४ ते ०८ डिसेंबर २०२३

२.दुसरा टप्पा दि. ११ ते १५ डिसेंबर २०२३ ३. तिसरा टप्पा दि. १८ ते २२ डिसेंबर २०२३

इयत्ता ६ वी ते ८ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाच्या संभाव्य तारखा यथावकाश कळविण्यात येतील.

विभागस्तर प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी विभाग स्तरावरील DIET प्राचार्य यांच्यावर असणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी प्रती प्रशिक्षणार्थी प्रती दिन रक्कम रु. १५००/- प्रमाणे निधी विभागीय DIET यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. सोबत विभागनिहाय अपेक्षित प्रशिक्षणार्थी तज्ज्ञ व वर्ग संख्या याचा तक्ता जोडला आहे. दि. २२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रशिक्षण स्थळ व प्रशिक्षणार्थी संख्या विभाग स्तरावरील DIET प्राचार्य यांनी SCERT या कार्यालयास ssa@maa.ac.in या मेलवर व संबंधित जिल्ह्यांचे DIET प्राचार्य आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक/प्रशासनाधिकारी मनपा यांना कळवावे.

सर्व जिल्ह्यातील DIET प्राचार्य यांनी दि. २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत संबधित सर्व प्रशिक्षणार्थी यांना विभाग स्तरावरील निवासी प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहणे बाबत आदेशित करावे.

(मा. संचालक यांच्या मान्यतेने)

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा

for downloa d click Here


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.