MPSP अंतर्गत विद्या समीक्षा केंद्र पुणे मार्फत साप्ताहिक स्वाध्याय सुरु करणेबाबत
उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे. त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.
सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत राज्य मंडळाशी सलग्नित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या इ. 2 री ते ८ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अध्ययन निष्पत्ती निहाय ऑनलाईन साप्ताहिक स्वाध्याय प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येत आहे.
सदर उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी आपल्या अधिनस्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून शाळा व शिक्षकांना आदेशित करावे.
सोबत : १. साप्ताहिक स्वाध्याय वेळापत्रक
२. मार्गदर्शक सूचना
अधिक माहिती व सविस्तर मार्गदर्शक सूचना खाली पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .