केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३, cluster-Head-Departmental-Limited-Competitive-Examination-2023

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दि २९ नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार....

महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/ प्र.क्र. ८१ / टीएनटी १, दि. १५/०९/२०२२ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३ " चे आयोजन डिसेंबर महिन्यात नियोजित असून ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२३ ते ०८/१२/ २०२३ या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जातील त्यानुसार परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३ प्रसिध्दीपत्रक

या कार्यालयाची अधिसूचना जा.क्र.मरापप/ बापवि/२०२३/३५०४, दिनांक ०५/०६ / २०२३ अन्वये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३ या परीक्षेचे आयोजन माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये घेण्याचे नियोजित होते. परंतू मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल झालेल्या होत्या. त्यामुळे शासन पत्र संकिर्ण २०२२ / प्र.क्र.८१/ टीएनटी-०१, दि. २० जून २०२३ अन्वये मान्यता मिळाल्यानुसार मा. न्यायालयीन दाखल याचिका व प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानुसार शासन निर्णय संकिर्ण २०२२/ प्र.क्र.८१ / टीएनटी-०१, दि. २७ सप्टेंबर, २०२३ अन्वये सदर परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

तरी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे www.mscepune.in या संकेतस्थळावर दि. ०१/ १२ / २०२३ ते दि. ०८ / १२ / २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करावी. यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरीत्या ऑनलाईन पध्दतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

तसेच मा. न्यायालयाच्या आदेशान्वये ज्या उमेदवारांनी ईमेलव्दारे माहिती पाठवून परीक्षा शुल्काचा भरणा केला आहे, अशा उमेदवारांचे पडताळणी करुन त्यांच्या बँक खाते क्रमांकावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सदरील परीक्षा शुल्क यथावकाश परत करण्यात येईल. तथापि सदर उमेदवारांनी पुनश्चः ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क दिलेल्या मुदतीत भरणे बंधनकारक राहील.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.

download click Here

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.