राज्यातील अप्रशिक्षीत शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून सेवेचे लाभ मिळणेबाबत.

 राज्यातील अप्रशिक्षीत शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून सेवेचे लाभ मिळणेबाबत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि 2 नोव्हेंबर २०२३ रोजी परिपत्रक काढून शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना सूचित केले आहे कि....
राज्यात पूर्वी मागास प्रवर्गाचे प्रशिक्षीत उमेदवार मिळत नसल्यामुळे अप्रशिक्षीत शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सेवेत असतांना ते प्रशिक्षीत झालेत. त्यांना त्यावेळी अप्रशिक्षीत वेतन श्रेणी होती. त्यांना नियुक्ती दिनांकापासुन खालील लाभ मिळावेत.

१) निवड व वरीष्ठ श्रेणीसाठी नियुक्ती दिनांक ग्राह्य धरणे

२) दि.०१.११.२००५ पुर्वी नियुक्ती असल्यामुळे जुनी पेंशन योजना लागू करणे

३) इतर सेवा विषयक लाभ

उपरोक्त विनंतीच्या अनुषंगाने आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास सादर करावेत, ही विनंती.

अधिक माहितींसाठी खालील परिपत्रक वाचा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.