आंतरजिल्हा बदलीचा ६ वा टप्पा राबविण्याबाबत...

 आंतरजिल्हा बदलीचा ६ वा टप्पा राबविण्याबाबत...


            दि 3 नोहेंबर २०२३ रोजी शिक्षण विभागाने परिपत्रक निर्गमित करून ग्रामविकास विभागास विनंती केली आहे कि...

मा. मंत्री (शालेय शिक्षण व मराठी भाषा) यांचे अध्यक्षतेखाली राज्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने दि. २८.१०.२०२३ रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी केलेल्या मागणीस अनुसरुन शक्य तितक्या लवकर आंतरजिल्हा बदली धोरणामध्ये आंतरजिल्हा बदलीचा ६ वा टप्पा राबवून सन २०२२ मध्ये अर्ज भरलेल्यांना फॉर्म एडीट करण्याची संधी व सन २०२२ मध्ये अर्ज न भरलेल्या सर्व बदलीपात्र झालेल्या शिक्षकांना नव्याने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देणेबाबत मा. मंत्री महोदयांनी संमती दिलेली आहे. तरी आंतरजिल्हा बदलीबाबतचे धोरण आपल्या विभागांतर्गत राबविण्यात येत असल्याने, संघटनांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या संमतीस अनुसरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच आवश्यकता वाटल्यास या विभागाचे अभिप्रायास्तव नस्ती सादर करण्यात यावी, ही विनंती..

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा..



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.