पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) फेब्रुवारी 2024
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 30 नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित
उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) दि. 18 फेब्रुवारी, 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना दि. 01/09/2023 रोजी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०७ डिसेंबर, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०७ डिसेंबर, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ०७ डिसेंबर, २०२३ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .