केंद्रप्रमुख पदावरील निवडीबाबतची कार्यपध्दती व अर्हता याअनुषंगाने सूचना निर्गमित करणे...

 केंद्रप्रमुख पदावरील निवडीबाबतची कार्यपध्दती व अर्हता या अनुषंगाने सूचना निर्गमित करणेबाबत






शालेय शिक्षण विभागाने दि २७ सप्टेंबर २०२३ रोजी ग्राम  विकास विभागाला निर्गमित  केलेल्या सुचनेनुसार...

महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरीता या विभागाच्या दि.१४.११.१९९४ च्या शासन निर्णयान्वये केंद्रप्रमुखाचे पद निर्माण करण्यात येऊन, केंद्रप्रमुखाची निवड सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे करण्याची तजवीज करण्यात आली. तद्नंतर दि. ०२.०२.२०१० च्या शासन निर्णयान्वये केंद्र प्रमुखांची पदे भरण्याचे प्रमाण ४०:३० : ३० (सरळसेवा, पदोन्नती, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा) असे निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुख पद ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्याचे संबंधित नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार दिनांक १०.०६.२०१४ च्या अधिसूचनेन्वये सदर पदाच्या सेवाविषयक बाबींबाबतच्या तरतूदी विहित करण्यात आल्या. यामध्ये विषयानुरुप पदोन्नती देण्याबाबत तरतूद विहित करण्यात आली आहे. त्यानुसार या विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय दि. १६.०२.२०१८ अन्वये केंद्रप्रमुखांची पदे भरण्याबाबत निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दतीमध्ये विषयानुरुप पदे भरण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. परंतु यानुसार केंद्रप्रमुखांची पदे भरली जात नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने ग्राम विकास विभागाच्या सहमतीने केंद्रप्रमुख भरतीबाबत दिनांक ०१.१२.२०२२ च्या शासन निर्णयान्वये सुधारित कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये विषयानुरुप पदे भरण्याबाबतची तरतूद समाविष्ट करण्यात आलेली नाही.

दिनांक ०१.१२.२०२२ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या अर्हतेमध्ये शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ अन्वये सुधारणा करण्यात आली. तद्नंतर शासन निर्णय दि.२७.०९.२०२३ अनुसार केंद्रप्रमुख पदावरील निवडीकरीता सुधारित अर्हता निश्चित करुन शासन शुध्दीपत्रक अधिक्रमित करण्यात आलेले आहे. उक्त प्रमाणे वेळोवेळी विहित केलेल्या धोरणास अनुसरुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी ग्राम विकास विभागास वेळोवळी कळविण्यात आले आहे. सबब, शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ आणि शासन निर्णय दि. २७.०९.२०२३ मधील तरतूदीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये सुधारणा करण्यात यावी. तसेच सदर सुधारीत अधिसूचना निर्गमित होईपर्यंत केंद्रप्रमुख संवर्गातील पदोन्नतीसंदर्भात शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ आणि शासन निर्णय दि. २७.०९.२०२३ मधील तरतूदीनुसार कार्यवाही करण्याबाबत आपले स्तरावरुन सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात यावे.

तसेच आपल्या विभागाच्या कार्यासन आस्था १४ कडून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी मागविलेल्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने विषयनिहाय पदोन्नती देणेबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. परंतु यानुसार बऱ्याच ठिकाणी विषयानुरुप पदोन्नती देण्याबाबत अडचणी येत असल्याने व केंद प्रमुखाची पदे भरली जात नसल्याने शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२ केंद्रप्रमुख पद भरतीबाबत सुधारित कार्यपध्दती विहित करण्यात येऊन, शासन निर्णय दिनांक २७.०९.२०२३ अन्वये अर्हता निश्चित करण्यात आलेली आहे. यास्तव आपणाकडून निर्गमित करण्यात आलेले संदर्भाधीन पत्र दि. २४.०५.२०२३ येथील पत्र रद्द करण्यात येऊन, केंदप्रमुख पदावर विषयानुरुप पदोन्नती न देता शिक्षकांची सेवाज्येष्ठता विचारात घेऊन पदोन्नती देण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात यावे. तसेच केंद्रप्रमुख पदाच्या अनुषंगाने आपणाकडून निर्गमित करण्यात येणारी तसेच या विभागाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या पत्रव्यवहारामध्ये समानता रहावी तसेच याबाबत क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही करताना संभ्रमावस्था निर्माण होऊ नये, यास्तव या विभागाचे अभिप्राय घेऊन क्षेत्रीय स्तरावर मार्गदर्शनपर पत्र निर्गमित करण्यात यावीत, ही विनंती.

शालेय शिक्षण विभागाने दि २७ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षण संचालकांना केलेल्या पत्रानुसार....

उक्त विषयांकित संदर्भीय पत्रांस अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीकरीता मुख्याध्यापक पदवीधर शिक्षकांना विचारात घेतले जात नसल्याची बाब निदर्शनास आलेली असल्याने, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर संवर्गातून मुख्याध्यापक झालेले प्रशिक्षित पदवीधर मुख्याध्यापक हे केंद्रपमुखाच्या पदोन्नतीसाठी पात्र समजण्यात यावेत, अशी आपण संदर्भ क्र. १ येथील पत्रान्वये व्यक्त केलेली धारणा पक्की करण्यात येत आहे. याअनुषंगाने केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीकरीता सेवाज्येष्ठता यादी तयार करताना प्रशिक्षित पदवीधर मुख्याध्यापक यांना विचारात घेण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना आपल्या स्तरावरुन सूचना देण्यात याव्यात.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.