बदली बाबत परिपत्रक दि 12 ऑक्टोबर 2023
ग्राम विकास विभागाचे उपसचिव श्री पो द देशमुख यांनी नागपूर उच्च न्यायालयाचे शासकीय अभियोगकता यांना दि 12 ऑक्टोबर निर्गमित केलेल्या पत्रा नुसार ....
विषयांकित रिट याचिकेतील याचिकाकर्ते हे वेगवेळया जिल्हा परिषद शाळांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षक आहेत. शासन पत्र दि.२३.०८.२०२३ मध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे याचिकाकर्त्यांना सन २०२३ मधील आंतरजिल्हा बदलीप्रकियेत नव्याने अर्ज भरण्याची संधी देण्याची व दि.२३.०५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया राबविण्याची याचिकाकर्त्यांची विनंती आहे. तसेच ज्या शिक्षकांचे सन २०२२ मध्ये अर्ज सादर केल्यानंतर आता संवर्ग बदल झाला आहे अशा शिक्षकांना नव्या संवर्गातून अर्ज भरण्याची संधी देण्यात येण्याची विनंती केली आहे.
२. विषयांकित रिट याचिकेच्या अनुषंगाने खालील वस्तुस्थिती मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती.
१. शिक्षक भरतीसाठी रिक्त पदांची संख्या सुनिश्चित करणेसंदर्भात तसेच, रिक्त पदांवर नियुक्ती देत असताना काही सुधारित अटी लागू करण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाकडून दि.२१.०६.२०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. सदर शासन निर्णयामध्ये ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची सन २०२२ मधील कार्यवाही
झाली आहे. तथापि, सन २०२२ मधील आंतरजिल्हा बदलीसाठी विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज
प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही
ग्रामविकास विभागाने करावी, असे निर्देश दिलेले आहेत.
२. शालेय शिक्षण विभागाच्या सदर शासन निर्णयास अनुसरुन सन २०२२ मधील आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही अशाच शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज विचारात घेऊन बदलीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर बदलीप्रक्रिया ही सन २०२२ ची असल्याने यात नवीन बदली अर्जाचा विचार करण्यात आलेला नाही. सन २०२३ साठीची बदलीप्रक्रिया सुरु झाल्यानंतर सन २०२३ मध्ये बदलीसाठी विनंती केलेल्या बदलीपात्र शिक्षकांचा बदलीप्रक्रियेमध्ये विचार करण्यात येईल.
वेषयांकित याचिकेच्या अनुषंगाने उपरोक्त बाबी मा. न्यायालयाच्या निदर्शनात आणण्यात यावी, ही विनंती.
अधिक माहिती साठी खालील पत्र पहा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .