जिल्हा परिषद शाळा (लोकल बॉडी) संचमान्यता दुरुस्तीबाबत

  जिल्हा परिषद शाळा (लोकल बॉडी) संचमान्यता दुरुस्तीबाबत


श्री. शरद गोसावी शिक्षण संचालक ,प्राथमिक यांनी दि ९ ऑक्टोबर २०२३ च्या पत्रानुसार वरीष्ठ तांत्रिक संचालक एनआयसी पुणे यांना सूचित केले आहे कि.....

विषयांकीत प्रकरणी राज्यातून जिल्हा परिषद, मनपा (लोकल बॉडी) क्षेत्रातील जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांच्या संचमान्यता दुरुस्तीसाठी प्रस्ताव प्राप्त होत आहेत.यामध्ये प्रामुख्याने पटसंख्या कमी-जास्त असणे, पटसंख्या असूनही शिक्षकांची संख्या पटसंख्येवर आधारीत दिसत नाही, तसेच पटसंख्या व खोलीच्या संख्या पर्याप्त असतानाही शिक्षक त्या त्या प्रमाणात मंजूर न झाल्याचे प्रस्तावामध्ये नमूद केलेले आहे. विद्यार्थी संख्या पुरेशी असूनही विद्यार्थीसंख्या 01 (एक) किंवा 00 (शून्य) असणे, संच मान्यतामध्ये कमी वा शिक्षक पदे दिसत नाहीत.

सदरच्या बाबी हया तांत्रिक स्वरुपाच्या असल्याने या प्रकरणी आपल्या स्तरावरुन पडताळून योग्य विद्यार्थी संख्येची माहिती संच मान्यता प्रणाली उपलब्ध करुन द्यावी व संचमान्यता प्रणालीमध्ये आवश्यक त्या बाबी पूर्ण करुन संचालनालयास अवगत करावे. त्यानंतर संचालयास्तरावरुन संच मान्यता जनरेट करण्याची आवश्यक ती कार्यवाही करणे शक्य होईल.

(उक्त बाबीसंदर्भात एनआयसी पुणे यांना दुरुस्तीबाबत निर्देश दिलेले आहेत. ज्या शाळांच्या संचमान्यता सुधारीत करणे आवश्यक आहे अशा सुधारीत संचमान्यता दुरुस्ती होईपर्यंत लोकल बॉडी अंतर्गत असलेल्या त्या शाळांबाबत शिक्षकांच्या समायोजन तूर्त करु नये.)

खालील परिपत्रक पहा..



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.