यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देणेबाबत.

यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देणेबाबत.



MPSP ने दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी परिपत्रक काढून सूचित केले आहे कि...

सन २०२१-२२ या मागील वर्षामध्ये यु-डायस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची सविस्तर नोंदणी करण्यासाठी कळविण्यात आले होते परंतु असे दिसून आले आहे, की शाळेत शिक्षण घेत असुनही बऱ्याच विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही. त्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापकांकडून इयत्ता २री ते १२वी पर्यंत विद्यार्थी जे सध्या त्याच शाळेत शिक्षण होत आहेत त्यांची माहिती नोंदविण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करण्यात येत आहे.

विद्यार्थी नोंदणी बाकी असण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगण्यात येत आहे :-

  • आधार क्रमांक नसल्याने नोंदणी बाकी आहे.
  • माहिती पूर्ण न भरल्याने डिलीट करण्यात आली आहे.
  • शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती भरलेली नाही.

याबाबत आपणास कळविण्यात येते की, शाळेच्या मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांची माहिती न नोंदविण्याबाबत खुलासा घेण्यात यावा व त्या शाळांची माहिती व खुलासा सोबत दिलेल्या लिंकवर भरण्यात यावा त्यानंतर जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

इयत्ता २री ते १२वी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी बाकी असलेल्या शाळांची माहिती दि. २५ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत खालील लिंकवर उपलब्ध करून देण्यात यावी.

(विद्यार्थ्यांची नोंदणी बाकी असलेल्या शाळांनी खालील लिंक वर नोंद करा.)

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf1OAsJvl0wWX2WVQqW6UUQQlauFateW5BxWW918JDYy-m7Ww/viewform?usp=sf_link 

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा




Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .