सन २०२३-२४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये इयत्ता २री ते १२वी पर्यंत तालुका स्तरावरून विद्यार्थी माहिती नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत
MPSP ने दि २५ ऑक्टोबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार.......
सन २०२३-२४ या वर्षामध्ये इयत्ता १ली मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता १ली ते १२वी पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन केले आहे त्यांच्या माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास आवश्यक बदल तात्काळ करून घ्यावेत जेणे करून सर्व विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरली जाईल. सन २०२२-२३ या वर्षामध्ये राज्यातील सुमारे ५००० शाळांमधील इयत्ता २री ते १२वी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी विविध कारणामुळे झालेली नाही, त्या विद्यार्थ्यांची नोंदणी सन २०२३-२४ या वर्षामध्ये करण्यासाठी सुविधा मिळावी यासाठी शाळांकडून विनंती करण्यात येत आहे. याबाबत केंद्र शासनाकडे कळविले असता त्यांनी विद्यार्थी नोंदविण्याकरिता तालुका स्तरावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांची माहिती नोंदविण्यापूर्वी मुख्याध्यापक/प्राचार्य यांचेकडून संबंधित विद्यार्थ्यांची माहिती मागील वर्षी नोंदविली नसल्याचे लेखी पत्र घ्यावे व नंतर तालुका स्तरावरून नोंदणी करण्यात यावी जेणे करून विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी होणार नाही. याकरिता केंद्र शासनाने शाळांकडून लेखी स्वरूपात भरून देण्याबाबतचा नमूना फॉर्म उपलब्ध करून दिला आहे, सदर फॉर्म शाळांचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांचेकडून गटशिक्षणाधिकारी यांनी भरून घ्यावा. त्यानंतरच तालुका स्तरावरून नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करावी.
सदर कामकाज कालमर्यादेत पूर्ण करावयाचे असल्याने लवकरात लवकर सर्व शाळांकडून विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण होईल यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .