राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा : २०२३
देशभरातील प्रयोगशील शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी व शिक्षणप्रेमी यांच्यासाठी सुवर्णसंधी!
स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशन, महाराष्ट्र (सर फाऊंडेशन महाराष्ट्र) आयोजित 'राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा २०२३' मध्ये शालेयस्तरावर विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना (नवोपक्रमांना) याद्वारे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
_ मराठी, हिंदी आणि इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेत नवोपक्रम सादर करता येईल._
_ देशभरातील प्रयोगशील शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी व शिक्षणप्रेमी यांना सहभागी होण्याची संधी असेल._
सूचना
नवोपक्रमाचे लेखन पुढील मुद्यांच्याच आधारे केलेले असावे.
मुद्दे :
१. नवोपक्रमाचे शीर्षक
२. नवोपक्रमाची गरज व महत्त्व
३. नवोपक्रमाची उद्दिष्टे
४. नवोपक्रमाचे नियोजन
५. नवोपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही
६. नवोपक्रमाचे निष्कर्ष / फायदे
७. परिशिष्ट
८. नवोपक्रमाची सद्यस्थिती
या अपलोड करावयाच्या pdf फाईलला इंग्रजीत तुमचे नाव द्या. याची साईज १० एम.बी. पर्यंतच असावी.
(संपूर्ण नवोपक्रम तयार करून त्याची पीडीएफ झाल्यानंतरच आपण वरील लिंकला क्लिक करून ती फाईल सबमिट करायची आहे)
नवोपक्रम नमुना पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
टीप : स्पर्धेची अंतिम तारीख: 25 नोहेंबर २०२३
टीम सर फाऊंडेशन, महाराष्ट्र
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .